Breaking News

1/breakingnews/recent

तुळशीचे पाने त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर

No comments



मुंबई -

धार्मिकदृष्ट्या, तुळशीची रोपटे अतिशय पवित्र मानले जाते. असा विश्वास आहे की, घरात हे रोपटे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते, तसेच कुटुंबात आनंद आणि समृध्दीचे वातावरण तयार होते. तुळस या वनस्पतीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे, तुळशीला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हटले जाते, जी एखाद्या व्यक्तीला अनेक आजारांपासून वाचवते. तुळशीपासून अनेक सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक फायदे देखील मिळतात. 

१. तुळशीच्या उपयोगामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने वापरणे हा रामबाण उपाय आहे.

२. तुळशीच्या पानांचे चूर्ण संत्र्याच्या पावडरमध्ये मिक्स करा आणि यापासून पेस्ट तयार करा. संत्र्याच्या सालांची पावडर देखील आपण घरच्या घरी तयार करू शकता अथवा आयुर्वेदिक स्टोअरमधून विकत घेऊ शकता.

३. तुळस आणि संत्र्याच्या पावडरपासून तयार केलेल्या पेस्टनं दोन ते तीन मिनिटांसाठी दात ब्रशने स्वच्छ करा. यानंतर पाण्याने तोंड धुऊन घ्या. ही प्रक्रिया रात्री झोपण्यापूर्वी नियमित करायची आहे.

४. मुरुम कमी करण्यासाठी तुळशीचे दोन पाने (ताजी) घ्या. गुलाब पाण्याच्या एक ते दोन थेंबामध्ये ही पाने कुस्करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मुरुमांवर लावा आणि सुकू द्या.

५. त्वचेचा रंग उजळण्यासाठीही आपण तुळशीचा उपयोग करू शकता. यासाठी तुळशीची ताजी पाने किंवा तुळशीची पावडर वापरावी. तुळशीची 15 ते 20 पाने वाटून त्यामध्ये दोन चमचे दूध मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *