Breaking News

1/breakingnews/recent

अभिनेत्री नेहा खानची संघर्षगाथा

No comments


मुंबई-

देवमाणूस या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत एसीपी दिव्या सिंहच्या एन्ट्रीने ट्विस्ट निर्माण झाला आहे. गावाला गंडवणाऱ्या डॉ. अजितकुमार देवचे काळे धंदे दिव्या उघडकीस आणणार, असे वाटत होते. मात्र आता खुद्द दिव्याच अजितच्या जाळ्यात फसताना दिसत आहे. दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अभिनेत्री नेहा खानचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. तिची आई मराठी, तर वडील मुस्लीम. नेहा ही तिच्या वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी. नेहाच्या आई-वडिलांचे लव्ह मॅरेज. धर्म वेगवेगळे असल्यामुळे दोन्ही परिवारांनी त्यांना स्वीकारले नाही.

नेहाच्या आईची परिस्थिती लग्नाच्या वेळी अत्यंत बिकट होती. नेहाच्या आजोबांचे निधन झाले होते. त्यामुळे तिच्या आईवर कुटुंबाची जबाबदारी होती. लग्नानंतर आपली परिस्थिती सुधारेल, या आशेने तिने आंतरधर्मीय असूनही विवाह केला. मात्र लग्नानंतर त्यांच्या स्थितीत फारसा फरक पडला नाही. नेहाच्या आईला प्रॉपर्टी मिळू नये, म्हणून काही गुंडांनी जोरदार मारहाण केली होती. यामध्ये तिच्या आईला शरीरभर 370 टाके पडले. आपल्यावर आळ येण्याच्या भीतीने त्या काळात वडीलही फरार झाले होते. अशा परिस्थितीतही तिच्या आईने हिंमत दाखवून नेहा आणि तिच्या भावाचा सांभाळ केला. आमच्या शेजारच्या काकू एक दिवस मला फोटो स्टुडिओमध्ये घेऊन गेल्या. फोटोग्राफरने माझे फोटो काढले आणि मला विचारले, की तुझे फोटो पेपरमध्ये देऊ का? माझ्या घरात आरसा नव्हता. त्यावेळी मला माझ्या सौंदर्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. पण फोटोखाली आपले खान आडनाव दिले, तर पुन्हा माझ्या वडिलांच्या कुटुंबाच्या भावना दुखावतील, अशी भीती मला वाटली. त्यामुळे मी नेहा महल्ले असे आईचे आडनाव दिले. तो फोटो माझ्या परिचित लोकांनी पाहिला आणि मला हिरोईन होण्याचा सल्ला दिला, असे नेहा सांगते.

नेहा खान मूळ अमरावतीची. मुंबईत ऑडिशनला येण्यासाठी तिला खूप कसरत करावी लागायची. वडिलांना समजू नये, यासाठी ती छोटीच बॅग सोबत बाळगायची. फेसबुकवर ओळख झालेल्या ऑडिशन घेणाऱ्या लोकांना भेटायचे. कधी ट्रेन चुकली, तर पेपर टाकून मुंबई छशिमट स्टेशनवर झोपायचे. दोन-तीन वर्ष हा प्रकार केल्याचं नेहा सांगते. किशोरी शहाणे, सतीश कौशिक यांचे सेक्रेटरी म्हणून काम केलेल्या अमरजीत यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांन मदत केली आणि युवा हा जिमी शेरगिलसोबत पहिला सिनेमा मला मिळाला. बॅड गर्ल, काळे धंदे, शिकारी, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स सारख्या चित्रपटातून तिने काम केले आहे. आता देवमाणूस या मालिकेमुळे नेहा खान हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहे.


 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *