अनिल परबांचा गृहखात्यात वाढताहस्तक्षेप, देशमुखांची तक्रार, शरद पवारांकडून उघड नाराजी
मुंबई -
गृहखात्यामूळ आता पुन्हा एकदा नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारात शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शरद पवार प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच ही गोष्ट शरद पवार यांच्या कानावर घातली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा मुद्दा मांडल्याचे समजते आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली होती. अखेर शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढली होती. या काळात गृह खात्यातील अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेक बैठक अनिल परब यांच्या बंगल्यावर पार पडल्याचे समजते आहे. आता अंबानी स्फोटक प्रकरणातील सचिन वाझेंच्या कथित सहभागानंतर अनिल देशमुख यांच्याकडून पुन्हा एकदा अनिल परब यांच्या गृहखात्यातील हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments
Post a Comment