शहराची खबरबात - नगरसेविका सुनीता कोतकर यांच्या प्रयत्नातून प्रलंबित प्रश्न सुटणार
News24सह्याद्री - नगरसेविका सुनीता कोतकर यांच्या प्रयत्नातून प्रलंबित प्रश्न सुटणार... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
१. अहमदनगर ते भिंगार शहर बस सेवेची वर्षपूर्ती
अहमदनगर ते भिंगार शहर बस सेवेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सेवा देणारे चालक आणि वाहकांचा माळीवाडा बसस्थानकात थे सत्कार करण्यात आलाय. .
२. २०२१- २२ चे ६८५ कोटींचे बजेट स्थायीला सादर
अहमदनगर महानगरपालिकेचे सन 2021- 22 चे 684 कोटी 89 लाख रुपयांच मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती अविनाश भोसले यांच्याकडे आयुक्त शंकर गोरे यांनी सादर केलय. या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न रु 305 कोटी 95 लाख ,भांडवली जमा रुपये 332 कोटी 63 लाख धरण्यात आला आहे.
३. महिलेचे दागिने ओरबाडणारा अखेर जेरबंद
नगर तालुक्यातील एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे.
४. मनपातील सफाई कामगारांचे प्रश्न सुटणार
अहमदनगर महानगरपालिकेतील ल सफाई कामगारांचे विविध प्रश्नअनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रश्नांची दखल महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाने घेतलली आहे.
५. नगरसेविका सुनीता कोतकर यांच्या प्रयत्नातून प्रलंबित प्रश्न सुटणार
जसाजसा निधी उपलब्ध होत आहे. त्यानुसार प्रभागातील विकासकामे करीत आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना मी नुसती प्राधान्य देत नाही तर ती मार्गी लावत आहे.
No comments
Post a Comment