Breaking News

1/breakingnews/recent

कोरोनाचे क्रिकेटवर सावट! भारताच्या महिला टी-२० संघाची कर्णधार पॉझिटिव्ह

No comments



मुंबई -

महाराष्ट्रासह भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे.  त्यातच आता क्रिकेटवरही कोरोनाचे सावट असल्याचे यला मिळत आहे. नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत खेळलेल्या सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण, बद्रीनाथ आणि इरफान पठाण अशा भारताच्या चार माजी क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ आता भारताच्या महिला टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हरमनला मागील चार दिवस ताप होता. त्यामुळे सोमवारी तिने कोरोनाची चाचणी केली. त्यात तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका या महिला संघांमध्ये टी-२० मालिका झाली. मात्र, हरमन दुखापतीमुळे या मालिकेला मुकली. 

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केले असून कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करत आहे. मागील सात दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करते. देवाच्या कृपेने आणि चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे मी लवकरच मैदानात पुनरागमन करेन असे हरमन तिच्या ट्विटमध्ये म्हणाली. नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिका झाली. हरमन दुखापतीमुळे या मालिकेला मुकली. या मालिकेत हरमनच्या अनुपस्थितीत स्मृती मानधनाने भारताचे नेतृत्व केले. भारताने ही मालिका १-२ अशी गमावली. त्याआधी झालेल्या एकदिवसीय मालिकेत मात्र हरमन खेळली होती. या मालिकेच्या चार डावांमध्ये तिने १६० धावा केल्या होत्या.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *