Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नगर शहरात सर्व कोविड सेंटर सुरु होणार

No comments

    News24सह्याद्री नगर शहरात सर्व कोविड सेंटर सुरु होणार..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1.  मे ला होणार नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उदघाटन    
अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज नगर जिह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केलीय.

२. अरणगावमध्ये कोरोना रुग्णांचा उद्रेक
नगर तालुक्यातील अरणगाव मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 200 च्या वर गेल्याने तालुका प्रशासनाने गावात आठ दिवस कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. दरम्यान तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढल्याने अकोळनेर  गाव देखील बंद करण्यात आल आहे. 

३. नगर शहराचे नवीन रूप लवकरच पाहायला मिळणार - आ.जगताप
आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि नगरसेवक नज्जू पैलवान यांच्या प्रयत्नातून मनपातील प्रभाग क्रमांक 11 मधील अशोका हॉटेल ते रामचंद्र खुंट रस्ता डांबरीकरण आणि पेविंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. 

४. हसन मुश्रीफ यांनी सुचवला भन्नाट उपाय
पालकमंत्री हसन मुश्रीफ आज नगरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी गेल्या वेळी लोकांच्या मनात कोरोनाची भीती होती. यावेळी तशी भीती राहिलेली नाही. लोक बिनधास्त फिरत असल्याने संसर्ग वाढतो आहे. तर केंद्र सरकार लसीकरणासाठी विविध बंधने घालीत आहे. 

५. नगर शहरात सर्व कोविड सेंटर सुरु होणार(मनपा )
नगर शहरात वाढती संख्या पाहून आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील सर्व कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरांमध्ये 453 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून  त्यात लष्करी तळालगत असलेल्या भिंगार शहरात 26 जणांना कोरोना संसर्गाच निदान झालं आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *