माझी चूक झाली कायद्यानुसार जरुर कारवाई करा, सर्वच नेत्यांवर कारवाईची मागणी - जलिल
मुंबई -
संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर AIMIMचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. त्यांच्या या कृतीवर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली आहे. त्यानंतर अखेर खासदार जलील यांनी आपली चूक मान्य केली आहे. होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा, असे जलिल यांनी म्हटले आहे. पण आपली चूक मान्य करतानाच त्यांनी नियम मोडणाऱ्या सर्वच नेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. सर्वसामान्यांना जो कायद्या त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा.
मात्र, मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी जलील यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. पण या निर्णयाला जलिल यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. जलिल यांनी तर या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचे आदेश काल देण्यात आला. लॉकडाऊन रद्दच्या निर्णयानंतर जलिल आणि त्यांचे काही कार्यक्रर्ते रस्त्यावर उतरले. समर्थकांनी जलिल यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूकही काढली होती.
No comments
Post a Comment