जिल्ह्याची खबरबात - युवतीची गळफास घेवून आत्महत्या
News24सह्याद्री - युवतीची गळफास घेवून आत्महत्या....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. शिर्डीला खा डॉ.प्रितम मुंडे व रक्षा खडसे यांची भेट
साईबाबांच्या शिर्डीला आज खासदार रक्षा खडसे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी सदिच्छा भेट दिलीय. यावेळी त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतल . यावेळी साई संस्थानाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय.
2. देवगडचे दत्त मंदिर दर्शनासाठी बंद
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पुन्हा एक वर्षानंतर आजपासून श्रीक्षेत्र देवगड संस्थानाच्या वतीने भगवान दत्तात्रयांचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलय.
३.अंगावर डिझेल ओतून पेटवून दिल्याची गंभीर घटना
जिल्ह्यात सध्या महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ सरपण तोडल्याच्या किरकोळ कारणावरून जावेनेच आपल्या जावेच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिल्याची गंभीर घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे.
4. शेवगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीची विज बिल भरण्यासाठी जनजागृती
शेवगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीने विज बिल भरण्यासाठी जनजागृती केलीय. यावेळी घोटण, खानापूर, करेटाकळी येथील शेतकऱ्यांनी कृषी पंप विज बिल भरून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी वीज बिल वेळेत भरावे अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल.
5. अखेर ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले
जामखेड तालुक्यातील दिघोळ याठिकाणी तीन दिवसात ४२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या गावात अत्यावश्यक सेवा वगळता पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
6. शिक्षकांच्या शासकीय वेतनाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ.डॉक्टर सुधीर तांबे यांचा सत्कार
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या शासकीय वेतनाचा प्रश्न नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरवठा करून मार्गी लावल्याबद्दल अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार डॉक्टर तांबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकजण उपस्थित होते.
7. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी
श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील शेतकरी शेतातील कामे करण्यासाठी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
8. नगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या
अहमदनगर जिल्ह्यात आज अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडलाय. पाथर्डीमध्ये अनेक ठिकाणी गारांमुळे पिकांचे नुकसान झालं आहे.
9. शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक
शॉर्टसर्किटमुळे श्रीरामपूर तालुक्यातील शिरस गाव येथे चार एकर ऊस जळून खाक झाला आहे . या घटनेत एकूण सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
10. युवतीची गळफास घेवून आत्महत्या
मोबाईल मधील फोटोमुळे झालेल्या बदनामीच्या त्रासाला कंटाळून युतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संगमनेर खुर्द परिसरात घडली आहे.
No comments
Post a Comment