जिल्ह्याची खबरबात - कोविड सेंटरची पाहणी संतापले खा.डॉ. सुजय विखे
News24सह्याद्री - कोविड सेंटरची पाहणी संतापले खा.डॉ. सुजय विखे....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. कोविड सेंटरची पाहणी संतापले खा.डॉ. सुजय विखे
शिर्डी सह राहता तालुक्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने तसेच साई संस्थानच्या कोविड सेंटरमधील व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अचानक पणे शिर्डी कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली साई संस्थानचे कोविड सेंटरचा त्या कोरोना रुग्णांनी संख्या बरीच आहे त्यातच रुग्णांचे नातेवाईक सर्रासपणे जेवणाचे डबे घेऊन येत असून कुठल्याही प्रकारचे नियम या सेंटरमध्ये पाळल्या जात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल.
2. कर्जत मिरजगाव मध्ये कोरोना अँटीजेन चाचणी
कर्जत तालुक्यात मिरजगाव मध्ये कोरणा बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे याची दखल घेऊन प्रशासनाने मिरजगाव मधील भाजीविक्रेते व्यापारी फळ विक्रेते यांची कोरोना रुग्णाची अँटीजेन चाचणी मिरजगाव मधील मुख्य बाजारपेठेत सुरू करण्याचा निर्णय घेतला.
3. काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
कोपरगाव तालुक्यातील अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
4. संगमनेर तालुक्याची वाटचाल लॉकडाऊनकडे
अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज मोठ्या संख्येने रुग्णसमोर येत असल्याने जिल्ह्यातील अहमदनगर शहर,राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील कोविड स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
5. कामगारांना न्याय मिळाल्याचे समाधान
मुळा प्रवरा संस्थेच्या माध्यमातून पाच वर्ष कारभार करताना द्वेष विरहित आणि सहकारी संस्था टिकावी म्हणूनच निर्णय केले या माध्यमातून कामगारांना न्याय देण्यात आल्याचे समाधान आहे.
6. अपंग महिलेची ही हृदय हेलावरी घटना
एका अपंग महिलेची ही हृदय हेलावरी घटना आहे. गेले तीस ते पस्तीस वर्षांपासून साई भक्तांकडे भिक्षा मागून जीवन जगणारी सुशीला ढोकळा ही वयोवृद्ध महिला पायाने अपंग ,जगण्याला साई नामाचा आधार आजवर साई बाबांच्या दरबारात मिळेल ते खाणार रस्त्यावर झोपणार आणि आपलं आयुष्य शिर्डी मध्ये काढून हात पाय धरल्यानंतर सहारा मिळेल या उद्देशाने आपली बहीण आणि मेहुण्याला दर महा पैसे पुरवणारी ही महिला आज हतबल झाली आहे.
7. शेतातील झोपडी पेटवली अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
नेवासा तालुक्यात एका शेतातील झोपडी ला कोणी अज्ञाताने आग लावल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहेयात.
8. प्रशासनाच्या नियमाचा उल्लंघन करू नका-बाळासाहेब थोरात
राज्यात कोरोना ने पुन्हा एकदा डोकं वर काढल आहे त्याच पाश्वभूमीवर प्रशासनाचे नियन पाळा सोशल दिसतानसिंग ठेवा जेणे करून लोकडाऊनची परिस्थिती उध्दभवणार नाही
9. तहसील दालनाच्या बाहेर धुडगूस घालणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शेवगाव तहसील कार्यालयाच्या दालनाच्या च्या बाहेर गोंधळ घालणाऱ्या दोन जणांविरुद्ध व त्यांच्या साथीदारांनी विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
10. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे नामकरण
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन घेण्यात आली यावेळी अनेक सभासदांनी कारखान्याचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे नाव कारखान्याला देण्यात यावी.
No comments
Post a Comment