Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - महेश तनपुरेच्या घरातून पुरावे जप्त

No comments

    News24सह्याद्री महेश तनपुरेच्या घरातून पुरावे जप्त..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1. अहमदनगर रिंगरोड बाह्यवळण रस्त्याला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी
शहरातील प्रस्तावित रिंग रोड बाह्यवळण रस्त्याच्या कामामध्ये लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. शहराचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता अहमदनगर शहरातून विविध राज्यांना जोडणारी महामार्ग आहेत. .

2. कोरोना नियमांचे उल्लंघन सावेडीतील बड्या हॉटेलांवर कारवाई
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंग पालन करावे, असे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
 
3. पोलिस अन् मनपाचे संयुक्त दक्षता पथक ठेवणार लक्ष
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी प्रभाग समितीनिहाय ४ पथक नियुक्त केले आहेत. हे पथक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

4. तनपुरेच्या घरातून पुरावे जप्त
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला सूत्रधार बाळ बोठे हा फरार असताना त्याला मदत करणाऱ्या महेश तनपुरे याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यात तनपुरे बोठेशी शी संपर्क साधण्यासाठी वापरत असलेल्या अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

5. कापड बाजारात दुकानांवर कारवाई
शहरात कोरूना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना विषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बाजारात अचानक तपासणी करून एका दुकानावर कारवाई केली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *