लॉकडाऊनच्या काळातील स्थलांतरित मजुरांचा संघर्ष दाखवणारी एक डॉक्यूमेंट्री
मुंबई -
मागील वर्षात कोरोना विषाणूमुळे जगभरातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला व अनेक संघर्षाचा सामनादेखील लोकांनी केला आहे. एक वर्षानंतरही अद्याप या जगाला कोरोना विषाणूपासून मुक्त करण्यात यश आलेले नाही. गेल्या वर्षी, 24 मार्च 2020मध्ये भारतात लॉकडाउन घोषित केला गेला होता. हा लॉकडाउन 2 महिन्यांहून अधिक काळ चालला आणि या वेळी बर्याच लोकांची एक वेळच्या अन्नाची देखील भ्रांत निर्माण झाली. त्या काळातील या मुद्द्यावर आता एक पत्रकार-चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी एक डॉक्यूमेंट्री केली आहे. या डॉक्यूमेंट्रीचे नाव आहे ‘1232 केएम’ आणि यात स्थलांतरित कामगारांच्या व्यथा चित्रित केल्या गेल्या आहे. तब्बल 1232 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या घरी पोहोचणार्या 7 मजुरांच्या संघर्षावरून या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. विनोद कपरी यांनी या चित्रपटात बरेचसे मूळ फुटेज वापरले आहेत, म्हणून त्यास फीचर फिल्मपेक्षा डॉक्युमेंटरी फिल्म म्हणणे अधिक चांगले वाटते.
चित्रपटात, हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या घरांमधून प्रवास करणाऱ्या या स्थलांतरित मजुरांचा प्रवास दाखवला जाईल. त्यांना या काळात किती कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला आणि कसे ते त्यांच्या घरी पोहोचले, तर त्यांच्यातील काही जण कधीच घरी पोहोचू शकले नाहीत, या संघर्षाची कहाणी यात दिसणार आहे. या माहितीपटात आपल्याला स्थलांतरित मजुरांची कहाणी पाहायला मिळेल. ज्यांनी दिल्ली ते बिहार हा प्रवास आपल्या सायकलने पूर्ण केला. जो मार्ग जवळपास 1000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या 7 प्रवाश्यांसह बरेच अंतर एकत्र पार केले आहे. ऑस्कर विजेता गुनित मोंगा आणि मेरल्टा फिल्म्स या चित्रपटाचे निर्माते आहे. या चित्रपटाचे संगीत गुलजारच्या गीतांनी सजलेले आहे. तर, त्याला विशाल भारद्वाज यांनी संगीत दिले आहे. त्याचवेळी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सुखविंदर सिंगचा आवाज देखील ऐकू येतो.
No comments
Post a Comment