'मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचे दिसून आले; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली"
मुंबई -
नारायण राणे म्हणाले की 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर आहे'. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. तसंच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याआधी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही नारायण राणे यांनी यावेळी केली आहे. उद्धव ठाकरेंना वर्षभर चांगलं काम करता आले नाही.
सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणे वाझेंकडे देण्यात आली होती. संबंध नसतानाही वाझेंकडे ही प्रकरणे का देण्यात आली, असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेंकडून सर्व कामे करुन घेतली आहे. असा दावा देखील नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे संसद भवन येथे बोलत होते. सचिन वाझे आधी सस्पेंड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना डिपार्टमेंटमध्ये घेतले. तसेच त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली आहे. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आले. यावरून, मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचे दिसून येते असे नारायण राणे म्हणाले.
No comments
Post a Comment