Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

No comments

News24सह्याद्री सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन एका विवाहितेने आत्महत्या केली. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समृद्धी अजय जगताप राहणार गांधीनगर बोधेगाव असं मयत विवाहितेचे नाव आहे.

2. कोरोना बाधितांचा शहरात विक्रमी आकडा
गुरुवारी दुपारपर्यंत 1338 कोरोना बाधित नगर शहरात गुरुवारी दुपारपर्यंत 457 नवीन कोरोना बाधित यांची नोंद झाली असून, हा आकडा जिल्ह्यात 1338 आहे. नगर पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण संगमनेर शहरात असल्याची नोंद आहे. 

3. अनिल राठोड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  
नगर राज्याचे माजी महसूलमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नगर दौऱ्यात नेता सुभाष चौकातील शिवालयात भेट देऊन स्वर्गीय अनिल राठोड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

4. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश  
राज्यासह जिल्ह्यात वेगाने फोफावत चाललेला कोरोना चा प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने आता मास्क आणि  सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग पालन करणे, बंधनकारक असणार आहे.. जर असे आढळून आल्यास म्हणजेच या नियमांचं उल्लंघन एखाद्या आस्थापनांमध्ये होत असेल, तर ती अस्थापना सात दिवस बंद करण्यात येणार आहे.

5. शहरातील आजची विक्रमी रुग्ण संख्या पाहता जिल्ह्यात नवीन निर्बंध
अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक कोरोणाला गांभीर्याने घेत नसल्याचं पुन्हा अधोरेखित झाला आहे. वारंवार आवाहन करून देखील लोकांमध्ये निष्काळजीपणा समोर येत आहे.गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यात 1338 नवीन रुग्ण वाढले आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *