Breaking News

1/breakingnews/recent

कोणत्या प्रकारचे मॉइश्चराइझर त्वचेसाठी योग्य

No comments


मुंबई -

जर आपल्याला असे वाटत असेल की, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी केवळ फेस सीरम, टोनर आणि साैदर्य उत्पादने पुरेसे आहे, तर तसे नाही. ‘मॉइश्चराइझर’ त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. मॉइश्चराइझर जरी तेलकट असले तरी ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. घराच्या बाहेर कुठेही पडताना मॉइश्चराइझर लावणे गरजेचे आहे. तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चराइझर असतात हे लक्षात ठेवा. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चराइझरचा उपयोग करावा. यामुळे त्वचेवर अतिरिक्त प्रमाणात होणारा तेलाचा स्त्राव नियंत्रणात येण्यास मदत मिळते.

रूक्ष त्वचेसाठी ऑइल बेस्ड किंवा क्रीम बेस्ड या दोन्ही प्रकारचे मॉइश्चराइझर उपयुक्त आहेत. खबरदारी म्हणून आपल्या त्वचेच्या प्रकारानुसारच योग्य मॉइश्चराइझरची निवड करावी. तेलकट त्वचा दीर्घकाळापर्यंत निरोगी आणि तरूण दिसावी, यासाठी मॉइश्चराइझरचा उपयोग करणं अतिशय आवश्यक आहे. तेलकट त्वचा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतरच चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावणे आवश्यक आहे.

तुमची त्वचा संमिश्र प्रकारची असेल तर स्किन मिस्ट आणि सीरमचा उपयोग करावा. त्वचेसाठी कोणत्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट वापरावे, याबाबत ब्युटी एक्सपर्ट किंवा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्वचेवर कशा प्रकारे मॉइश्चराइझर लावावे, याबाबतची सविस्तर माहिती बहुतांश ब्युटी प्रोडक्टवर दिलेली असते. यासाठी एखादे प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी लेबलवरील संपूर्ण माहिती वाचणे आवश्यक आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *