लग्नापूर्वी मुलगा आणि मुलीची रक्त-कुंडली तपासली जावी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन
मुंबई
हिंदू धर्मात लग्न करताना मुलगा आणि मुलीची कुंडली बघितली जाते. त्यांचे 36 पैकी किती गुण जुळतात याचा अभ्यास केला जातो. मात्र, या कुंडलीसोबतच मुलगा आणि मुलीची रक्त-कुंडली देखील तपासली जावी, त्यांच्या रक्ताचीदेखील चाचणी केली जावी, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत मांडले. लोकसभेत खासदार मनोज कोटक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन यांनी ही बाब सांगितली. विशेष म्हणजे लग्नापूर्वी मुलगा आणि मुलीची रक्त-कुंडली तपासली जावी, यासाठी मोहिम राबवावी लागेल, असेदेखील ते यावेळी म्हणाले
लग्नाआधी रक्त-कुंडली बघून युवक आणि युवतीला योग्य आरोग्य सल्ला दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे त्यातून संबंधित जोडप्याचे होणारे बाळ थॅलेसीमिया वाहक होऊ नये. त्यामुळे लग्नाआधी रक्त-कुंडली बघणे हे समाजासाठी आणि आजार संपवण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. दरवर्षी 8 मे रोजी थॅलेसीमिया आजार साजरा केला जातो. देशात दरवर्षी दहा हजार थॅलेसीमिया बाधित बालके जन्माला येतात. त्यामुळे लग्नाआधी थॅलेसीमिया टेस्ट व्हावी, असे तज्ज्ञ म्हणतात. थॅलेसीमियाबाबत लोकांमध्ये जागरुकता होणे जरुरीचे आहे. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता नसल्याने रुग्णावर पुरेसा उपचार होत नाही. देशात दरवर्षी हजारो थॅलेसीमिया बाधितांचा मृत्यू होतो. त्यामुळे लग्माआधी थॅलेसीमिया चाचणी करावी, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
थॅलेसीमिया हा रक्ताचा आजार आहे. या आजारामुळे शरीरातील ब्लड सेल्स कमजोर होतात. काही लोकांमध्ये जीन्स वेरिअंट्स नसल्याने या आजाराची लागण होते. या आजारात हिमोग्लोबिन प्रोटीन बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हिमोग्लोबिनच्या माध्यमातूनच रेड ब्लड सेल्सला ऑक्सिजन पोहोचतो. आई किंवा वडील या दोघांपैकी कुणीही एकाला जरी हा आजार असला तर हा आजार मुलाला देखील होण्याची शक्यता असते. थॅलेसीमिया बाधित बालकांना एका विशिष्ट ठरलेल्या वेळेत शरीरात नवे रक्त चढवावे लागते. त्यामुळेच जर आई-वडिलांपैकी कुणीही या आजाराने बाधित असेल तर मुलाचा विचार करु नये, असा सल्ला डॉक्टर देतात.
No comments
Post a Comment