Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - राहुरी महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण

No comments

 News24सह्याद्री - राहुरी महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या





TOP HEADLINES

1. पारनेर महसूल व पोलीस प्रशासनाने पकडला 40 ते 50 लाखाचा वाळूसाठा
पारनेर तालुक्यातील महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्तरीत्या  तालुक्यातील नागापुरवाडीच्या डुबेवाडी येथील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यां विरोधात बुधवारी उशीरा केलेल्या कारवाईत सुमारे 100 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असून एक पोकलेन मशीन व दोन ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहेत. 

2. राहुरी महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण  
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून जागा मालकाने विज पुरवठा बंद केला. तसेच महावितरण नवीन कनेक्शन देत नाही. या सर्व प्रकाराला कंटाळून दि. २२ मार्च रोजी सौ. सुनिता निकम, सुभद्रा वांडेकर, आशाबाई कनगरे यांनी राहुरी येथील महावितण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.

3. जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन केली प्रकरणाच्या चौकशी साठी कमिटीची नेमनूक  
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड  हासनाबाद येथे  सन २०१७ ते,२०१९ या कालावधीत शेततळी, कांदाचाळी  फळबाग या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा अरोप सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांनी केलेला आहे. 

4. मार्केट विभागाच्या पथकाने केली धडक कारवाई
कोपरगांव नगरपरिषदेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाडे व संकलित व इतर कर  वसुलीसाठी कोपरगांव नगरपरिषदेने आज मुख्याधिकारी प्रशांत सरोदे  यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे  यांच्यासह मार्केट विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली.

5. शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
शेवगाव शहरात भटके कुत्र्याच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण असुन शेवगाव शहरातील अनेक भागात रोड वर कुत्र्यांच्या वावर वाढलाय आहे. याचा प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय..भटक्या कुत्र्यांची संख्याही  झपाट्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.

6. आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेत क्रीडा समितीची बैठक संपन्न
तहसील कार्यालय कोपरगाव येथे आमदार अशुतोश काळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा समितीची बैठक पार पडली. यावेळी मागील बैठकीत ठरवण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच पुढील काळात तालुका क्रीडा संकुलामध्ये वाढवण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल चर्चा करण्यात आली.

7. चोरटयांनी गुरुजींना लुटले
अज्ञात चोरट्यांनी प्राथमिक शिक्षकाला अडवून लुटल्याची घटना तालुक्यातील खांडगाव फाटा परिसरात घडली आहे खांडगाव फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात तिघा मोटरसायकलस्वार आणि त्यांची मोटरसायकल अडविलेले त्यांच्याजवळील रेडमी कंपनीचा मोबाईल व गाडीची चावी काढून घेत पलायन केले हा प्रकार समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली काही नागरिकांनी चोरट्यांचा शोध घेतला मात्र चोरटे पळून गेले होते 

8. शेवगावच्या सोळा गावातील ८५४ हेक्टरला अवकाळीचा तडाखा
 तालुक्यातील १६ गावात ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात देण्यात आली. हा अहवाल वरिष्ठांना पाठविल्याचे कृषी अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले. 

9. संगमनेर तालुक्यात मालवाहू ट्रक मधून डिझेल चोरांची टोळी सक्रिय
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील समर्थ पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या मालवाहू ट्रक मधून 300 लिटर डिझेल चोरीची घटना ताजी असतानाच गावानजीकच्या तिरुपती बालाजी पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास उभा केलेल्या तीन मालवाहू ट्रक मधून चोरट्यांनी पुन्हा 300 लिटर डिझेलची चोरी केली.

10. नवनाथ विद्यालयाला नगर तालुक्यात तंबाखू मुक्त शाळा होण्याचा प्रथम बहुमान
निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयाने नगर तालुक्यात तंबाखू मुक्त शाळा मनाचा प्रथम बहुमान पटकावला आहे शासनाच्या आरोग्य विभागाने पारित केलेल्या नवीन निकषाप्रमाणे जिल्हा तंबाखू मुक्त नियंत्रण अभियानांतर्गत लांब मुंबई फाऊंडेशन व हम संस्थेच्या वतीने शाळेचे प्रशिक्षण करून तंबाखू मुक्त शाळा म्हणजे प्रमाणपत्र दिले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *