शरद पवार मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया
मुंबई -
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (३० मार्च) मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या (३१ मार्च) त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्याआधीच्या काही चाचण्यासांठी ते रुग्णालयात दाखल झाले आहे. काल त्यांना पोटात दुखू लागल्याने एडमिट केले होते. नंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा ते रुग्णायलयात दाखल झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात काल (२९ मार्च) दाखल केले होते. या ठिकाणी डॉक्टरांनी केलेल्या तपासनीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले आहे.
सध्या पवारांची प्रकृती स्थिर आहे असे सांगण्यात आले आहे.राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यावर त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पवार यांच्यावर शस्त्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.त्यामुळे या दरम्यान पवारांचे सर्व कार्यक्रम ही रद्द करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम रद्द शरद पवार हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित करण्यात आले होतो. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment