Breaking News

1/breakingnews/recent

उन्हाळ्यात 'या' फळांच्या सेवनाने आरोग्याला होतील अनेक फायदे

No comments

 News24सह्याद्री - 




उन्हाळा सुरू होताच उन्हाच्या झळा जाणवायला लागतात. वाढत्या तापमानामुळे शरीराला पाण्याची आवश्यकता जास्त असते. उन्हाळ्यात शरीराला आवशकता असते थंड पेयाची. बाजारात अनेक प्रकारची थंड पेय उपलब्ध असतात परंतु त्यामुळे आपली तहान तर भागवली जाते परंतु शरीराचे तापमान कमी ठेवण्यात मदत होत नाही. दही शेक हे त्यापैकीच एक उत्तम थंड पेय आहे . या हंगामात खाण्यापिण्याच्या वेळी थोडासाही निष्काळजीपणा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. उन्हाळ्यात भलेही अन्न कमी खात असाल, तरी द्रव आहाराकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे. या हंगामात बहुतेक पाण्याने भरली फळे विक्रीस उपलब्ध होतात.

1.कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पुरेसे पाणी असते. तसेच यात अनेक पौष्टिक घटक असतात आणि कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. हे फळ खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते आणि अधिकवेळ भूकही लागत नाही.

2.आंबा

आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्यात चवदार गराबरोबरच भरपूर फायबरही असते. त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे. आंबा आपल्या पाचन तंत्रासाठी अतिशय चांगला आहे. चयापचय वाढवण्यासाठी देखील आंबा मदत करतो. आंबा खाल्ल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळेस भरलेले राहते.

3.खरबूज

खरबूजात भरपूर पाणी असते आणि त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी असते. जर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर उन्हाळी आहारात खरबूज नक्की सामील करा. या फळामध्ये जीवनसत्त्वे अ, सी, बी 6, मॅग्नेशियम आणि फायबर आहेत.

4.अननस

अननसामध्ये कॅलरींचे प्रमाण कमी आहे. पण, त्यात भरपूर फायबर आणि व्हिटामिन सी आहे. हे आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे चयापचय वाढवण्याचे कामही करते.

5.पल्म

पल्म अर्थात आलू बुखारमध्ये अतिशय कमी कॅलरी आणि ग्लाइसेमिक इंडेक्स आहे, परंतु त्यात पौष्टिक मूल्य खूप जास्त आहेत. हे फळ खाल्ल्यास पोटाच्या समस्या नाहीशा होतात. चयापचय वाढवण्यात देखील हे फळ फायदेशीर ठरते.

6.सफरचंद

सफरचंदामध्ये कॅलरी कमी असून व्हिटामिन सी, मिनिरल्सबरोबर फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते.

7.द्राक्षे

द्राक्ष्यामध्ये व्हिटामिन सी आणि फायबरची मात्रा जास्त असल्याने वजन कमी करण्यास ते अतिशय उपयुक्त आहे. आपल्या आहारात द्राक्षाचा समावेश केल्यास काहीच दिवसांत फरक पडतो.

8.नारळपाणी

नारळपाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होवून चरबी कमी होण्यास मदत होते. नारळ पाण्याने शरीरातील पचन संस्था व्यवस्थित काम करते. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा देखील मिळते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *