Breaking News

1/breakingnews/recent

पंढरपूर पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, भाजपकडून राम शिंदेंना तिकीट देण्यासाठी हालचाली

No comments



मुंबई -

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ह्या निवडणुकी मध्ये ट्वीस्ट येत आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लाग आहे. अशातच या पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, भाजपकडून माजी मंत्री राम शिंडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याची चर्चा आता मतदारसंघात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं अकाली निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या जागी त्यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांनी उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून उशीर का केला जातोय? असा सवालही आता विचारला जात आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेतली. मात्र, त्यावेळी उमेदवारी जाहीर केली नाही. 

त्यानंतर दिल्लीत शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. अशावेळी भालके कुटुंबातील उमेदवार जाहीर करण्यास होत असलेला उशीर म्हणजे पार्थ पवार यांच्यासाठी वातावरण निर्मिती असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. दुसरीकडे भाजपचा उमेदवारही अद्याप निश्चित होऊ शकलेला नाही. भाजप प्रभारींनी बैठक घेत उमेदवार घोषित करणार असल्याचे सांगितले आहे. भाजपकडून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. असे असताना आता माजी मंत्री आणि कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांविरोधात पराभव स्वीकारावा लागलेले डॉ. राम शिंदे यांचंही नाव भाजपकडून पुढे केले जात आहे. पंढरपूर-मंगळवेठा विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देत भाजप जातीचे समीकरण जुळवण्याच्या आणि मतदारसंघात विजय मिळवण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. राम शिंदे यांच्या नावाला जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अनुकूलता असल्याचे बोलले जात आहे.

पंढरपुरात तिरंगी लढत होणार?

भाजपकडून राम शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भालके कुटुंबाला उमेदवारी टाळत पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेली. तर भगिरथ भालके हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेठा मतदारसंघाची पोटनिवडणूक तिरंगी होण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करत आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम -

>> अर्ज भरण्यास सुरुवात - 23 मार्च 2021

>> अर्ज भरण्याची अंतिम तारीख - 30 मार्च 2021

>> अर्जांची छाननी - 31 मार्च 2021

>> अर्ज मागे घेण्याची तारीख - 3 एप्रिल 2021

>> मतदान - 17 एप्रिल 2021

>> निवडणूक निकाल - 2 मे 2021

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *