सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
मुंबई -
अंबानींच्या घराजवळ स्फोटके सापडली.ह्या सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीस भडकल्या या खळबळजनक घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर एनआयएने तपास सुरू करत सचिन वाझे यांना अटक केली आहे. या अटकेनंतर ठाकरे सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडून कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाबरोबरच उद्योगपतींना धमकावण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला आहे.
“एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमधून भ्रष्टाचार करत आहे आणि उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत बनवत आहे. असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहे. दुसरीकडे वाझे प्रकरणावरून भाजपाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. “चौकशी होऊ द्या मगच वाझेंवर कारवाई करू अशीच तुमची भूमिका होती. अचानक वर्षा या तुमच्या अधिकृत निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत काय खलबंत सुरू झाली आहेत, मुख्यमंत्री साहेब?, असं म्हणत भाजपाने सध्या सुरू असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या बैठकांबद्दल सवाल उपस्थित केला आहे.
No comments
Post a Comment