Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - राहाता शहर पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या वाटेवर

No comments

 News24सह्याद्री - राहाता शहर पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या वाटेवर....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES

1. बापूसाहेब शिंदे यांचे उपोषण मागे   
जामखेड तालुक्यातील पिंपरखेड  हसनाबाद शिवारात  २०१७ ते २०१९ मध्ये कृषी विभागा अंतर्गत शेततळे, कांदाचाळ, फळबाग या  योजने मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे असा अरोप सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांनी केला आहे. 

2. शेवगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बंद 
शेवगाव तालुक्यातील मिरी रोडला असलेली बँक ऑफ महाराष्ट्र शाखा या बँकेतील काही कर्मचारी कोरोना बाधित असल्याने बँक बंद ठेवण्यात आली. 

3. आज राज्यावर पावसाळी संकट
राज्यात 18-21 मार्च दरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

4. घरगुती गॅस सिलेंडरचा साठा ठेवणाऱ्यांवर धडक कारवाई 
राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी अकोले तालुक्यातील राजूर गावात १६२ घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून अवैध वापर करणाऱ्यावर छापा टाकून धडक कारवाई केली. 

5. शहर पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या वाटेवर

कोरोनाच्या दुस-या लाटेत राहाता तालुका संक्रमणात आघाडी असून येथे प्रती दिवशी शंभर बाधितांची भर पडत आहे. सलग होणा-या बाधितांच्या संख्येमुळे शिर्डीसह तालुक्यात चितेंचे वातावरण जरी असले तरी नागरिक अजूनही गांभिर्यानं घेतांना दिसत नाही.


6. कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अर्धनग्न आंदाेलन
वेळोवेळी मागणी करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले गावाचा गत दोन महिन्यापासून खंडित झालेला वीजपुरवठा, वारंवार सांगून, निवेदन देऊन सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. 

7. विहिरीत आढळला मृतदेह 
संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील एका विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळून आला ही घटना काल उघडकीस आली आहे.

8. कोरोना विषयावर बैठक-तहसीलदार श्याम वाडकर    
पाथर्डी शहरातील नगरपरिषद कार्यालयात उद्या 11 वाजता कोरोना विषयावर बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी आज दिली आहे.

9. आम्हाला अंधश्रद्धा नको संविधान हवय -संतोष भोसले
श्रीगोंदा येथील ग्रामीण विकास केंद्र संस्था व मुंबई यांच्या माध्यमातून चालू असलेल्या सावित्री महिला समस्या निवारण केंद्र श्रीगोंदा येथे जामखेड येथे होणाऱ्या दिनांक २४ आणि २५ मार्च या दोन दिवसीय संविधान प्रचारक कार्यशाळेच्या तयारीसाठी आज श्रीगोंदा येथील ऑफिसमध्ये बैठक घेण्यात आली. 

10. घोड नदीचे आवर्तन २७ मार्च पासून सुटणार 
तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कुठेही कसर ठेवणार नाही घोड खालील शेतकऱ्यांची मागणी होती. 








No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *