Breaking News

1/breakingnews/recent

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अळूची पाने वरदान

No comments


News24सह्याद्री -

 हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यापैकी एक अळूची पाने ही एक अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. हृदयाच्या आकाराचे अळूच्या पानांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. भारतीय घरांमध्ये भाजी शिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, अळूची पाने खाल्ल्यावर वजन कमी करण्यास देखील मदत होते. या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

१. लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या आहे. जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होते. अळूच्या पानांमध्ये फारच कमी कॅलरी आढळतात. यात आहारातील फायबर देखील असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. विविध गुणांनी समृद्ध असल्याने, अरबी पाने शरीराच्या अनेक विकारांवर विजय मिळविण्यास मदत करतात. हे केवळ रक्तातील साखर नियंत्रित करतेच, परंतु डोळ्यांची दृष्टी देखील वाढवते.

२. हृदय शरीराच्या इतर अवयवांकडे रक्त पुरवठा करते. परंतु, जेव्हा चरबी जमा झाल्यामुळे या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, तेव्हा शरीरातील रक्ताचा प्रवाह थांबतो. हे टाळण्यासाठी अळूची पाने खूप फायदेशीर असतात. या पानांत नायट्रेट असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

३. उच्च रक्तदाब ग्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात अळूच्या पानांचा नियमित समावेश केला पाहिजे. यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. अळूचे पान नियमितपणे खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो.

४. रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा अ‍ॅनिमियाचा त्रास रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *