Breaking News

1/breakingnews/recent

‘झुठे नैना बोले…’ इंडियन आयडॉलच्या मंचावर अंजलीच्या शास्त्रीय गाण्याने बहार

No comments



मुंबई - 

अहमदनगर मधील अंजली गायवाड हिने तिच्या गाण्याने बाजी मारली आहे. सध्या प्रसिद्ध कार्यक्रम ‘इंडियन आयडॉल’चा 12 सीझन सुरु आहे. या पर्वाने रसिक श्रोत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. या एकापेक्षा एक सरस स्पर्धकांमध्ये अहमदनगरची गायिक अंजली गायकवाड प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. मुळची अहमदनगरची असणाऱ्या अंजलीने या आधीही अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या गायनाची चुणूक दाखवली आहे. नुकतच तिने या मंचावर ‘झुठे नैना बोले…’ हे शास्त्रीय संगीताचा बाज असलेले गाणे सदर केले आहे.  अंजलीच्या ‘झुठे नैना बोले…’ या गाण्यातील तिच्या सुरांच्या हरकती ऐकून मंचावर उपस्थित सर्वानीच तिचे कौतुक केले. या विशेष भागात प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि सध्याची आघाडीची अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली होती. दोघींनीही अंजलीचे खूप कौतुक केले.

‘सारेगमप’च्या लिटील चॅम्प या शोमध्ये अंजलीची बहीण नंदीनीनेही सहभाग घेतला होता. पण दुर्दैवाने ती शोच्या फिनालेपर्यंत पोहोचू शकली नव्हती. लिटील चॅम्पस शो सुरु झाला तेव्हापासून अंजली ही ‘टॉप 5’मध्ये होती. नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि जावेद अली व्यतिरीक्त 30 सदस्यीय ज्युरींनी हा शो जज केला होता. याआधीही अंजलीने तिच्या बहिणीच्या साथीने ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमात बाजी मारली होती. आपल्या संगीत प्रवासाविषयी सांगताना अंजली म्हणते, ‘माझ्या घरातच सुरुवातीपासून संगीतमय वातावरण होते. माझे वडीलच माझे गुरु आहे. ते घरीच मुलांना गायनाचे धडे देतात. मी तीन वर्षांचे होते, तेव्हापासून संगीत ऐकत आणि समजून घेत होते. माझ्या वडिलांनी माझ्यातील कला ओळखली आणि त्यांनी स्वतःच मला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. माझी बहिण नंदिनी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. खरे सांगायचे तर मी माझ्या ताईला बघूनच या क्षेत्रात आले 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *