शहराची खबरबात - पाणी प्रश्नावरून नागरिक आक्रमक, आंदोलनाचा दिला इशारा
News24सह्याद्री - पाणी प्रश्नावरून नागरिक आक्रमक, आंदोलनाचा दिला इशारा... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. वीज दर कमी करून घरगुती दराने बिले द्यावी- जिल्हा हॉटेल व परमिट रूम असोसिएशन
मार्च ते ऑक्टोबर 2020 या काळात हॉटेल व्यावसायिकांना भरमसाठ वीज बिले देण्यात आली आहेत कोरणा मुळे हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत.
2. पाणी प्रश्नावरून नागरिक आक्रमक आंदोलनाचा दिला इशारा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाकी ची लेव्हल घटल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे.
3. महावितरणच्या वसुलीसाठी व्यावसायिकांची पिळवणूक
शहरातील सराफ बाजार परिसरातील व्यवसायिकांची महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशहा पिळवणूक केली एक हजार रुपयांहून अधिक विजबील थकबाकी असणाऱ्यांना पैसे भरा अन्यथा वीज खंडित करू असा सज्जड दम महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय अनेकांनी उसनवारी करून बिले भरली तर बाजारपेठेतील सत्तर ग्राहकांची वीज खंडित करण्यात आलीये.
4. साईदीप मध्ये अद्ययावत कॅन्सर विभाग-डॉ एस एस दीपक
दर्जेदार वैद्यकीय सेवेसाठी अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या साईदीप हॉस्पिटल मध्ये आता कॅन्सर वर परिपूर्ण उपचार सुविधा उपलब्ध झाली आहे.
5. वीज वितरणाची वसुली जोरात निर्मलनगर अंधारात
काल सकाळी दहा वाजल्यापासून निर्मल नगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करुनही वीज वितरण मंडळ सुस्त आहे वीज पुरवठा 24 तास झाले तरी सुद्धा खंडित आहे येथील नागरिक प्रामाणिकपणे वीज बिले भरत असून देखील.
No comments
Post a Comment