नियम पाळा अन्यथा कारवाई, नगरच्या गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच, दहा ठिकाणी कंटेन्मेंट झोन
अहमदनगर -
अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना वाढत असल्याने शहरातील गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच राहणार आहे. तर पालिकेकडून चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार आहेय. तसेच कोरोना रुग्ण वाढत असल्याने शहरातील दहा ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. नगर शहरातील माणिकनगर, विनायक नगर, सारसनागर, केडगाव तसेच बोल्हेगाव येथे 3 तर सावेडी परिसरात 3 आशा 10 ठिकाणी मिनी कॅन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता 28 मार्च पर्यंत याठिकाणी विविध निर्बंध घालण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या भागातील रहदारी आणि वाहने वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यावर संबंधितावर कायदेशीर कारवाई होईल, असे महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, बाहेर पडताना मास्क-सॅनिटायझर वापरावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात सरकारी कर्मचारी देखील आहेत. तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाहून अनेकांची धावपळ उडालीय. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून महिनाभरात 83 लाख दंड वसूल करून 66 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आलीये. तर 15 दिवसात 16 हजार लोकांवर कारवाई तर 28 लाख दंड आकारण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे असल्याचं सांगत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती केली. शिवाय नागरिकांना कोरोनाचे सगळे नियम पाळण्याचं आवाहन करत जे नागिरक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय. कापड बाजार, जिल्हापरिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियम मोडणाऱ्या नागरिकांवर आणि कर्मचाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली. ज्या दुकानात मास्क वापरले जाणार नाही ते दुकान महिनाभर सील करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त गर्दी करू नये. त्यासाठी पोलिसांची मंगल कार्यालयात गस्त असणार आहे. गर्दी आढळल्यास यापुढील काही दिवस मंगल कार्यालय बंद केले जातील, असा इशाराही देण्यात आलाय.
No comments
Post a Comment