Breaking News

1/breakingnews/recent

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील जिजी अक्का आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून

No comments



मुंबई -

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील मालिका गेल्या काही आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. अनेक आठवडे टॉप 5 मध्ये केवळ स्टार प्रवाहच्याच मालिका पाहायला मिळत आहेत. 'फुलाला सुगंध मातीचा'  ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत जिजी अक्काची भूमिका भाव खाऊन जात आहे. प्रख्यात अभिनेत्री अदिती देशपांडे  'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत जिजी अक्का ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. जामखेडकर कुटुंबाचा ती कणा. कमी शिकलेली सून असावी, अशी जिजी अक्काची मुलाच्या लग्नापूर्वी अट असते. मात्र आयपीएस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कीर्तीची लगीनगाठ जिजी अक्कांचा मुलगा शुभमशी बांधली जाते. लग्नाच्या वेळी जिजी तिच्या होणाऱ्या सूनेच्या शिक्षणाविषयी अनभिज्ञ असते. परंतु अचानक लग्नानंतर कीर्तीच्या शिक्षणाविषयी समजतं, तेव्हा जिजी अक्काची भूमिका काय असते, हे मालिकेत पाहायला मिळालं.

जिजी अक्का काहीशी काटेरी फणसाप्रमाणे आहे. मुलगा शुभम आणि सून कीर्ती यांच्यावर माया करणारी आणि प्रसंगी कानही धरणारी ही जिजी अक्का. कीर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर, तर शुभमची भूमिका अभिनेता हर्षद अतकरी साकारत आहे. अभिनेत्री आदिती देशपांडे यांनी जिजी अक्काची भूमिका वकुबीने निभावली आहे. आदिती देशपांडे या दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या स्नुषा. सुलभा देशपांडे यांनी शांतता कोर्ट चालू आहे या नाटकात साकारलेली बेणारे बाईंची भूमिका लोकप्रिय झाली होती. सखाराम बाईंडर, दुर्गा झाली गौरी, बाबा हरवले आहेत यासारखी काही नाटकंही त्यांनी केली. याशिवाय जैत रे जैत, भूमिका, विजेता, इजाजत, सलाम बॉम्बे अशा अनेक हिंदी मराठी कलाकृतींमध्ये त्यांनी व्यक्तिरेखा केल्या आहे. 


 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *