आंब्याचे शरीरावर होणारे फायदे
News24सह्याद्री -
सध्या बाजारात सर्वत्र आंबे दिसतात. आंबा सर्वांनच्याच आवडीचा फळ आहे. उन्हाळा आणि आंबा हे तर समिकरण तयार झालं आहे. आंबा हे फळ आपण अत्यंत आवडीने खातो. पण आंब्याचे शरीरावर होणारे फायदे आणि तोटे तुम्हाला माहिती आहेत का?
आंबा खाण्याचे फायदे -
आंबा खाण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे आंबा त्वचेला आतून साफ करतो. आंब्यात भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि विटॅमिन ए असतं. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते.
आंब्यात व्हिटॅमिन सी, ए आणि विविध प्रकारचं कॅरोटेनॉइड असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आंबा व्हिटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला हायड्रेटेट ठेवतो. एका अभ्यासात शरीराचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो.
ऍनीमियाच्या रुग्णांसाठी आंबा नैसर्गिक वरदान आहे. आंब्यात असणारं लोह शरीरासाठी फायदेशीर आहे. आर्यन आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी आंबा अतिशय गुणकारी आहे.
No comments
Post a Comment