जिल्ह्याची खबरबात - गळ्यातील मंगळसूत्र चोरुन पळणाऱ्या दोन मुली ताब्यात
News24सह्याद्री - गळ्यातील मंगळसूत्र चोरुन पळणाऱ्या दोन मुली ताब्यात....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. कोपरगाव तालुक्यातील मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथे सन २०२० - २१ जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत ४३.४६ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या मुर्शतपुर फाटा ते मुर्शतपुर गाव रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ३ लक्ष निधीतून मुर्शतपुर ते टाकळी शिव रस्ता मुरुमीकरण कामाचे भूमिपूजन आज आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.
2. मागील भांडणाच्या कारणातून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
मागील भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी केलेल्या जबर मारहाणीत शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील हरिभाऊ पांडुरंग बडधे याचा मृत्यू झाला.
3. गळ्यातील मंगळसूत्र चोरुन पळणाऱ्या दोन मुली ताब्यात
सटाणा येथील महिला परत जाण्यासाठी कोपरगाव बस स्थानक येथे बस मध्ये चढत असतांना या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन पळणाऱ्या दोन चोरट्या मुलींना सटाणा येथील एका मुलीसह प्रवाशी नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे.
4. बोधेगाव परिसरात गारपिटमुळे पिकांचे अतोनात नुकसान
शेवगाव तालूक्याच्या पुर्व भागातील बोधेगाव परिसरातील गावामध्ये शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस, व गारपीट झाली. यामध्ये काढणीसाठी आलेला गहू, कांदा, उन्हाळी बाजरी, ऊस, फळबागांचे पिक भुईसपाट झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
5. राज्य सरकारविरोधात नेवासेत भाजपची निदर्शने
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेवासा येथे भाजपच्या वतीने घोषणा देत निदर्शने करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा संघटन चिटणीस व तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी यावेळी केली.
6. 24 तासात 43 नव्या बाधितांसह दोघांचा मृत्यू
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये करोनाचा वेगाने फैलाव होत असून त्यात संगमनेर तालुका पहिल्या तीनमध्ये आहे. रोज रुग्णसंख्येचे विक्रमी आकडे समोर येत असल्याने तालुक्यात पुन्हा एकदा करोना सक्रिय झाला आहे.
7. अकोले महावितरण कार्यालयावर आंदोलन
वाढीव वीज बिल तसेच वारंवार होणारा खंडित पुरवठा यासाठी आज अकोले महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शेकडो शेेतकय्रांनी सहभाग घेतला होता.
8. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
लाॅकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिल माफ करावे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा करावे यासह शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड नगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
9. भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्र सरकारचा निषेध
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये मागितल्याचा आरोप होत आहे त्याबाबत भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र सरकारचा निषेध करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केली आहे.
10. पत्रात किती सत्यता ? सांगू शकत नाही - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
परमवीर सिंग यांनी दिलेल्या पात्रांबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे . परमवीर सिंग यांनी जी पात्र दिली आहेत ती बदली झाल्यानंतरची असून त्याबाबत मुख्यमंत्री स्वतः त्यात लक्ष घालत आहे.
Tags:
No comments
Post a Comment