सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे? - नारायण राणेचा सवाल
मुंबई -
गेल्या अनेक दिवसापासून राज्यभर चर्चेत असलेल्या सचिन वाझे प्रकरण काही शांत होण्याची चिन्ह काही दिसत नाही आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणवरून सत्ताधारी आणि विरोधी यांच्यामध्ये टीकाटिप्पणी होताना दिसत आहे. अशाताच या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी राणेंनी शिवसेनेचा अग्रलेखाचा धागा पकडत टीका केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या का?, सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या केल्यानंतर देखील त्याला अटक करू देत नव्हते. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याबद्दल असं काय प्रेम आहे? मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेच्या बॅकग्राऊंडचीही माहिती का नाही?, सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
फोन टॅपिंग बेकायदेशीर आहे हा नंतरचा भाग आहे पण त्या फोन टॅपिंगमध्ये काय आहे?, हे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांची नावं आली आहेत. नेत्यांची नावं आहे. ते आधी बाहेर काढले पाहिजे. टॅपिंग कायदेशीर होते की बेकायदेशीर होतं हा मुद्दा नंतरच मुद्दा असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. टॅपिंगमध्ये पैसा मागितल्याचं टेप झाले आहे. पण आपल्यावर आरोप होऊ नये म्हणून आयपीएस रश्मी शुक्लांवर आरोप होत आहे. ही कायद्याची चेष्टा आहे का, यावर मुख्यमंत्री का बोलत नाही, असे म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला आहे.
No comments
Post a Comment