Breaking News

1/breakingnews/recent

बिग बींच्या ‘चेहरे’चा मुहूर्त लागेना, चेहरे चित्रपटाचं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

No comments



मुंबई -

चेहरे हा चित्रपट गेल्या काही दिवांपासून बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि इम्रान हश्मी मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट ‘चेहरे’ चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली होती. हा चित्रपट ९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘चेहरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकल्याचे सांगितले आहे. ‘अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट चेहरे ९ एप्रिल २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण आत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 

लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाती तारीख कळवण्यात येईल’ असे त्यांनी ट्वीमध्ये म्हटले आहे. तरण आदर्श यांनी ट्वीटमध्ये इम्रान हाश्मीचे पत्रक जारी केले आहे. या पत्रकामध्ये, ‘सध्या कोरोनाचा संसर्ग होत असलेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे आणि चित्रपटगृहांसाठी देखील काही नियम आखण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही आमचा चित्रपट ९ एप्रिल रोजी प्रदर्शित करु शकत नाही. आम्ही चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मानापासून आभार’ असे म्हटले आहे.‘चेहरे’ चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे. या चित्रपटात कलाकारांची फैज पाहायला मिळणार आहे. अमिताभ आणि इम्रानसोबतच रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर देखील दिसणार आहेत. तसेच क्रिस्टल डीसूजासोबत रिया चक्रवर्ती देखील चित्रपटात दिसणार आहे.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *