शहराची खबरबात - जिल्हा परिषद मुख्यालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव
News24सह्याद्री - जिल्हा परिषद मुख्यालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. लसीकरणा बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी भूमिका
कोविड चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन आता सतर्क झाले आहे. कोविड ला रोखण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजे ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. मात्र लॉकडाऊन आणि लसीकरणा बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी भूमिका घेतली.
2. मूक आणि बिना अन्न शिवाय आंदोलन करण्याचा इशारा
जिल्हाधिकारी कार्यालयावर पगार संदर्भात निवेदन देऊन उपोषणास बसणार होतो परंतु सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या समोर पगारवाढीचा समेट चालू आहे. मात्र हा समेट घडत नसून केवळ चौदाशे रुपये दरवर्षी वाढ देत आहेत. कर्मचाऱ्यांना सध्याच्या महागाईच्या काळात हे परवडत नाही.
3. चंदनाच्या झाडांची चोरी करणारे आरोपी जेरबंद
अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये चंदन चोरीच्या घटना घडत आहे, कोपरगाव येथून अज्ञात चोरट्यांनी पंधरा हजार किमतीच्या चंदनाचे झाड चोरून नेले होते.
4. जिल्हा परिषद मुख्यालयात कोरोनाचा पुन्हा शिरकाव
नगर जिल्हा परिषद मुख्यालयात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे मागील काही दिवसात 13 अधिकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
5. नगरकरांना पाणीटंचाईचा करावा लागत आहे सामना
नगर शहराचा पाणीपुरवठा काही कारणांमुळे वारंवार खंडित होत असल्याने नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे महानगरपालिका आणि नगरसेवकांवर नागरिक रोष व्यक्त करत आहे.
No comments
Post a Comment