Breaking News

1/breakingnews/recent

जवस खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे वाचा !

No comments



 News24सह्याद्री -

सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो. मात्र, सौंदर्य दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे आंतरीक आणि दुसरे म्हणजे बाह्य सौंदर्य पण जास्त करून लोक बाह्य सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. बाह्य सौंदर्यासाठी ब्यूटी क्रिम आणि औषध देखील वापरतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, जवस आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. आपण जर आहारामध्ये जवसाचा समावेश केला तर त्याचे अनेक फायदे आपल्या त्वचेला होतील. तसेच जवसच्या नियमीत सेवनाने रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात राहू शकतात. स्त्रियांच्या बाबतीत हॉर्मोन्सची पातळी योग्य ठेवण्यासाठी जवसाचा उपयोग होतो.

1. उपासी पोटी तीन ते चार चमचा जवस खाल्ल्याने आपली त्वचा तजेलदार दिसते आणि चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास देखील मदत होते. तुमचा चेहऱ्यावर काळे डाग असतील तर दोन दिवसातून किमान एक वेळी तरी जवस खाल्ले पाहिजे.


2. पाठ दुखीवर जवस खूप गुणकारी आहे. पाठ दुखत असेल त्याठिकाणी जवस कपड्यात बांधून ठेवावे. त्यामुळे नसा मोकळ्या होण्यास मदत होते आणि तुमची पाठ दुखी दूर होईल.


3. जवस खाल्ल्याने पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते. आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.


4. दातासाठी जवस फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते.


5. जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तापाचे प्रमाण देखील कमी होईल.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *