पेरुच्या बिया आहेत औषधी गुणांचा भांडार, अनेक आजारांपासून होईल मुक्तता
मुंबई -
बहुतेक लोकांना पेरु हे फळ खायला आवडते. पेरु आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पेरु त्वचा आणि केसांसाठी खूप पौष्टिक फळ आहे. पेरूमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, फक्त पेरुच नाहीतर पेरुच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ज्यामुळे गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात पेरुच्या बिया खाण्याचे नेमके कोणते फायदे आहेत.
1. पेरुच्या बियामध्ये प्रथिने अधिक आढळतात. ज्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी कमी होते. टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरु आणि त्याच्या बिया एक चांगला आहार आहे.
2. पेरुच्या बिया खाल्याने आपले पाचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या देखील कमी होण्यास मदत होते.
3. जर पेरुच्या पानांचा काढा डायबिटीजच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी पिण्यास दिला तर, त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित होते. ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे सर्व त्रास दूर होतात.
4. पेरुमध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. पेरूच्या दाण्यांमुळे शरीरातील कार्बोहायड्रेट कमी होते. यामुळे वजन कमी करणे सोपे होते. त्यात आढळणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.
5. लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्ट्रॉल असते. पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे पुढील डायट शेड्युलमध्ये पेरूला नक्की स्थान द्या.
6. उच्च रक्तदाब असणाऱ्यांना डॉक्टर पेरुच्या बिया खाण्याचा सल्ला देतात. पेरुच्या बियामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असते जे रक्त प्रवाह नियंत्रित करते.
No comments
Post a Comment