जिल्ह्याची खबरबात - १० हजारांची लाच घेतांना नेवासा पो. ठाण्याचा कर्मचारी गजाआड
News24सह्याद्री - १० हजारांची लाच घेतांना नेवासा पो. ठाण्याचा कर्मचारी गजाआड....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. अहमदनगरमध्ये आणखी पाच कंटेनमेंट झोन जाहीर
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच आज अहमदनगर मध्ये कोरोनाचे 611 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे अहमदनगर शहरात आणखी पाच कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेत.
२. पो. महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी आज राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.
३. १० हजारांची लाच घेतांना नेवासा पो. ठाण्याचा कर्मचारी गजाआड
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मधील ऊस तोड कामगार आन कडून दहा हजार रुपयांची लाच घेताना नेवासा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोमनाथ कुंढारे याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडल आहे याबाबत नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
४. एस.एस.जी.एम.महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरु (कोपरगाव )
कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांवर योग्य उपचार होवून त्यांची गैरसोय होवू नये यासाठी आजपासून पासून एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात १०० बेडचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्यात येत असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
५. शेवगाव तहसीलच्या आवारात स्वच्छता अभियान संपन्न (शेवगाव )
शेवगाव तालुक्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येला आळा घालण्यासाठी शेवगावच्या तहसील कार्यालयामध्ये फवारणी करुन आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आलय.
६. मुळा नदीत आढळला पुरुषाचा मृतदेह (घारगाव पोलीस स्टेशन )
घारगाव गावच्या हद्दीतील मुळा नदीपात्रात ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना बुधवारी सकाळी बारा वाजता उघडकीस आली. शांताराम शिंदे अस मृत व्यक्तीचे नाव आहे.
७. शेवगावमध्ये शेतकऱ्याचा पाऊण एकर गहू अज्ञातांनी जाळला
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील छाया परदेशी यांच्या शेवगाव गेवराई महामार्ग जवळ असणाऱ्या अर्धा ते पाऊण एकर क्षेत्रामध्ये काढणी केलेल्या शेतात पसरलेल्या अवस्थेत असलेल्या गव्हाच्या पेंढ्या एका जागेवर जमा करून तो ढिगारा रात्रीच काही अज्ञात इसमांनी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
८. वाकडीत मृत कोंबड्यामुळे खळबळ
राहता तालुक्यातल्या वाकडी येथील श्री क्षेत्र खन्डोबा वाडी कडे जाणार्या रस्त्यालगत तसेच वाकडी गावाला पिण्याच्या पाण्याचा साठवण तलावाकडे गोदावरी कालव्याकडून साठवण तलावाकडे जाणाऱ्या नलिकेमध्ये मृत अवस्थेत असलेल्या २ गोण्या भरून गावरान जातीच्या कोंबड्या आढळून आल्यात.
९. कोपरगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ
दवाखान्यात वापरण्यात येणारे इंजेक्शन,सिरिंज ,कापूस यासारख्या वस्तू म्हणजे बायोवेस्ट मटेरियल कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कचरा म्हणून टाकण गुन्हा असताना देखील कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गाजवळील बेट परिसरात कोपरगाव शहरातील एका रुग्णालयाने हा कचरा आणून टाकल्याने एकच क्लबला उडाली आहे.
१०. नगर तालुक्यातील चास शिवारात डीजे लावून वरात
कोरोनामुळे अनेक निर्बंध लावले असताना रात्री लग्नाची वरात काढून डीजेच्या तालावर विनामास्क नाचणार्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी वरपित्यासह डीजे चालकावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
No comments
Post a Comment