महाराष्ट्र सरकारचा 3T वर भर, यानंतर वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या थांबणार का ?
मुंबई -
गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने कोरोना नियंत्रणासाठी कंबर कसलीय. सरकारने कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘3T’ उपाययोजना करण्यास सुरुवात केलीय. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. राज्यात रविवारी (28 मार्च) कोरोना रुग्णांच्या संख्येने एका दिवसात 40 हजार रुग्णांचा टप्पा पार केला आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्य सरकार ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर भर देत आहे. याशिवाय आम्ही महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची केंद्रे वाढवण्यासाठीही प्रयत्न करत आहोत. सध्या राज्यात बेड्स, औषधं आणि डॉक्टर्सची कोणतीही कमतरता नाही. जर कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहिली तर आम्हाला कोणता ना कोणता निर्णय घ्यावा लागणार आहे.
No comments
Post a Comment