Breaking News

1/breakingnews/recent

31 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - १0 लिटर दूध न दमता काढून दाखवा, राजू शेट्टींचं चॅलेंज...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. राजेश टोपेंचा राज्यातील जनतेला इशारा
राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्या लागू असणारे निर्बंध राज्य सरकारकडून अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. लॉकडाउनला उद्योजक तसंच महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत विरोध असल्याने निर्बंध अजून कठोर केले जाण्याची शक्यता असून राज्य सरकारकडून आज यासंबंधीची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

2. तीन पोलीस अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता
देशभरात गाजलेल्या गुजरातमधील २००४ सालच्या इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात अहमदाबाद येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. बनावट चकमक प्रकरणातील आरोपी असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

3. ‘पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस
पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच अद्याप पॅन आणि आधार लिंक न केलेल्यांच्या आयकर विभागाच्या साईटवर उड्या पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.  ३१ मार्च २०२१ आधी ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीत.

4. आणखी ३ राफेल लढाऊ विमाने आज भारतात होणार दाखल
  फ्रान्सच्या संरक्षण उत्पादक डॅसॉल्ट एव्हिएशन यांनी बनविलेले आणखी तीन राफेल लढाऊ विमानांची नवी तुकडी आज  भारतात दाखल होणार आहे. 

5. सांगलीत बिबट्या दिसल्याने खळबळ
सांगलीमध्ये बिबट्या दिसला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील राजवाडा परिसरात बिबट्या दिसला आहे. सकाळी साडेसहा वाजता राजवाडा चौकातील पटेल चौक मार्गावरून आलेल्या बिबट्याने बंद बंगल्यात ठाण मांडल्याची चर्चा होती. 

6. 10 लिटर दूध न दमता काढून दाखवा, राजू शेट्टींचं चॅलेंज
  राज्यातील प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या  निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेली एक मागणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संचालकपदाची निवडणूक लढवणाऱ्यांना एका दमात 10 लीटर दूध काढता, यायला हवं, अशी अट ठेवायला पाहिजे होती. 

7. “MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का?”
एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का ? असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे. औरंगाबादमधील लॉकडाऊनचा निर्णय रद्द होताच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी करत जल्लोष केला. 

8. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला  
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन राज्यात सध्या मानापमान नाट्य रंगले आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांना या सोहळ्याचे निमंत्रण नसल्यामुळे विरोधक राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

9. सरकारने एक दिवसआधीच जनतेला एप्रिल फूल बनवले,
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन केली आहे. मात्र राज्य सरकारने 1 एप्रिलच्या 2 दिवस आधीच जनतेला अक्षरश: एप्रिल फूल बनवले आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते
  
10. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं आज भूमिपूजन
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, समितीचे अध्यक्ष सुभाष देसाई, आदित्य ठाकरे उपस्थित रहाणार आहेत. मात्र कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांना निमंत्रण न दिल्याने मानापमान नाट्य रंगलं आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *