31 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे अत्याचार...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. अपघातात पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल संपत एकशिंगे यांचे मंगळवारी अपघाती निधन झाल.
2. कोपरगावमध्ये २ ठिकाणी अग्नितांडव
कोपरगावमध्ये काल वेगवेगळ्या दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
3. दारुड्या बापाने केला आपल्याच मुलाचा खून
दारुड्या बापाने आपल्या मुलाचाच खून केल्याची खळबळजनक घटना शेवगाव तालुक्यातील आखेगाव मध्ये मंगळवारी पहाटे घडलीय. यासंदर्भांत पत्नी ताराबाई हिने मुलाच्या हत्येबाबत आपल्या पतीविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
4. इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना वादग्रस्त वक्तव्यासंबंधी दिलासा मिळाला आहे. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
5. शॉर्टसर्किटने २ एकर ऊस जळून खाक
संगमनेर तालुकयातील पठार भाग साकुर येथील लतीफ पटेल यांच्या शेतामध्ये उसाला आग लागल्याची घटना घडलीय. या शेतातून महावितरणच्या विज वाहक तारा गेल्या आहेत. मंगळवारी साकुर संगमनेर रस्त्याच्या बाजूला महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे हि आग लागली आहे. यामध्ये पटेल यांच्या मालकीचा २ एकर ऊस जळून खाक झालाय.
6. बेलपिंपळगाव मध्ये ५ दिवसांचे लॉकडाऊन
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रोगाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणी अनेक गावामध्ये लोकडाऊन जारी करण्यात येत आहे.
७. दिवसांच्या लॉकडाऊनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दिवसांच्या लोकडाऊनला राहता तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळालं आहे. राहात्यात कोरोना रुग्णांचा संसर्ग वाढला होता.
8. अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे अत्याचार
राहुरी तालुक्यातील एका गावात आपल्या आजी आजोबांच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना डिसेंबर २०२० दरम्यान घडली आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. कोपरगाव पोलिस ठाण्यातून आलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तिच्या आई वडीलांनी ताबडतोब कोपरगाव पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवीली.
9. यादववाडी परिसरात नागरिकांना बिबट्याचे दर्शन
पारनेर तालुक्यातील यादववाडी परिसरांमध्ये बिबट्याच वारंवार दर्शन नागरिकांना होत आहे. 30 मार्चला सकाळी सहा वाजता काही नागरिकांना या परिसरात बिबट्या दिसलाय. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे.
No comments
Post a Comment