31 मार्च सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - वाढत्या उन्हामुळे हापूसला 'ताप'; शेतकरी चिंतेत!.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट केला शरद पवारांचा फोटो
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली होती. यानंतर शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांचे छायाचित्र शेअर केले आहे.
2. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काँग्रेसमधून शिवसेनेत थेट प्रवक्तेपदाची बक्षिसी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे.
3. नागपुरात रस्त्यावरील गुंडगिरीसमोर लोकांच्या जीवाचे मोल नाही का?
राज्याची उपराजधानी नागपूर ही गुन्हेगारीची राजधानी असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या काही वर्षामध्ये या शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
4. महाविकास आघाडीच्या समोर भाजपचा पराभवच होतो
राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा भाजपचा पूर्णतः पराभव होतो हे विधानपरिषद निवडणुकीत दिसून आले आहे.
5. भारत पाकिस्तान आमने-सामने येणार, एप्रिलमध्ये तिरंगी टी ट्वेन्टी मालिका
भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच व्हावी, अशी क्रिकेट रसिकांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची इच्छा आहे. त्यांची हीच इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान एप्रिल महिन्यात टी ट्वेन्टी सिरीज पार पडणार आहे.
6. कोरोना अॅक्टिव्ह झालाय, कठोर पावलं उचला नाही
देशभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कोरोना आताच सक्रिय झालाय. तात्काळ कठोर उपाययोजना करा, नाही तर पायाभूत सुविधा उद्ध्वस्त होतील.
7. वाढत्या उन्हामुळे हापूसला 'ताप'; शेतकरी, आंबा बागायतदार चिंतेत!
कोकणचा राजा. जगाच्या बाजारपेठेत देखील हापूसला मोठी मागणी आहे. शिवाय, खवय्यांना देखील उन्हाळ्याची चाहुल लागताच हापूसची चव चाखण्याची आतुरता असते. पण, यंदा नैसर्गिक संकटांमुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्यानं अद्याप देखील अपेक्षित प्रमाणात हापूस बाजारपेठेत दाखल झालेला नाही.
8. "देशद्रोह्यांना योग्य उत्तर देईल"ममता बॅनर्जी यांचा शुभेन्दु अधिकारी यांच्यावर निशाणा
पश्चिम बंगालमध्ये 1 एप्रिल रोजी दुसर्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संपला. पश्चिम बंगालमध्ये या दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राम जागेवरही मतदान होणार आहे. या जागेवर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री त्यांचे माजी निकटवर्तीय आणि भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्यासमोर आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी रॅली आणि रोड शो केला.
9. निधी वळता केल्याने जिल्हा परिषद सत्ता पक्षात अस्वस्थता
अकोला: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ५० कोटींच्या निधीपैकी २५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला प्राप्त झाला.
10. अल्पसंख्याकबहुल क्षेत्रातील विकासकामांसाठी २५ लाखांचा निधी
राज्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण भागात अनेक विकासकामे हाती घेण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्यात येत आहे. त्याद्वारे अमरावती जिल्ह्यातही विविध विकासकामांना चालना मिळणार असून, 25 लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे.
Tags:
No comments
Post a Comment