News24सह्याद्री - पत्रकार प्रदिप दिक्षीत यांच्यावर प्राणघातक हल्ला...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. वारुड येथील खळ्यांना भीषण आग
शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथे बुधवारी दुपारी 12 वाजता आठ ते दहा खळ्यांना भीषण आग लागली .या आगीत सुमारे 20 ते 25 लाखांचे नुकसान झालय. हि आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागली आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता गावातील पूर्वेकंदील भागात धूर निघताना दिसल्यावर गावातील ग्रामस्थांनी खळ्याकडे धाव घेतली.
२. पत्रकार प्रदिप दिक्षीत यांच्यावर प्राणघातक हल्ला
शिंदखेडा येथील दैनिक देशदुतचे ज्येष्ठ पत्रकार आणि सेवानिवृत्त प्राचार्य प्रा.प्रदिप दिक्षीत यांच्यावर आज रथ गल्ली चौकात प्रख्यात गुंड पवन कोमल सिंह राजपूत यांने प्राणघातक हल्ला चढविलाय.यावेळी पत्रकार विनायक पवार यांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.पवन राजपूत हा त्यांच्या रथगल्ली येथील जुन्या राहत्या घरी दगडफेक करीत होता.
३. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचचा भूमिपूजन सोहळा आज पार पडणार आहे.शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे.
४. मोठ्या सोसायट्या पुणे महापालिकेच्या रडारवर
दररोज 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांनी आपल्याच परिसरात त्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. त्यासाठी उभारलेले प्रकल्प बंद असल्यास अथवा प्रकल्पच उभारलेला नसल्यास अशा सोसायट्यांचा कचरा1 एप्रिलपासून न उचलण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
५. ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतून अभिनेत्री वीणा जगताप ची एक्झिट
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई माझी काळूबाई’ ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील मुख्य नायिका तब्बल तिसऱ्यांदा बदलली जात आहे. प्राजक्ता गायकवाड , वीणा जगतापनंतर आता ‘आर्या’ ही भूमिका अभिनेत्री रश्मी अनपट साकारणार आहे.
६. निमगडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नागपूरचा कुख्यात गॅंगस्टर रणजीत सफेलकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रणजीत सफेलकर पोलिसांच्या हाती लागल्याने नागपुरातील इतर अनेक मोठ्या गुन्ह्यांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तिविली जात आहे.
७. राज ठाकरेच बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज पार पडत आहे, दादर येथील महापौरांच्या निवासस्थानी ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.
८. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे आहेत.
९. अभियांत्रिकी महाविद्यालये संकटात
गेल्या पाच वर्षापासून अभियांत्रिकी प्रवेशाला लागलेली घरघर यंदाच्या शैक्षणिक वर्षातही कायम आहे. त्यातच करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींच्या कारणाने अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रवेशाची संख्या आणखी घटली आहे.
१०. भारतात वन प्लस ९प्रो ची विक्री सुरु
वनप्लसचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 9 प्रो भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. अमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी हा फोन चांगल्या ऑफरसह सादर करण्यात आला आहे. तसेच हा फोन OnePlus च्या वेबसाईटवरुन देखील खरेदी करता येईल.
No comments
Post a Comment