Breaking News

1/breakingnews/recent

31 मार्च Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - केंद्राकडून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा होणे गरजचे - खासदार श्रीकांत शिंदे........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. गोरगरीब रुग्णांना चांगला उपचार मिळवून देण्याचं आवाहन  
पाचोरा भडगाव मतदार संघात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आमदार किशोर अप्पा पाटील हे पुन्हा एकदा अकॅशन मोड मध्ये आले असून त्यांनी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात मंगळवार दुपारी ३.३० वाजता प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचेसह पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

2. वाहून गेलेल्या पाईपलाईन मुळे पाणि प्रश्न ऐरणीवर
 औरंगाबाद वाळूज एम आय डी सी परिसरात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसात सिडको वाळूज महानगरातील देवगिरी नदीवरील पाईपलाईन पुरामुळे वाहून गेली होती . ही पाईपलाईन नव्याने टाकून स्वप्नपूर्ती कॉलनीतील रहिवाशांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

3. डोंबिवलीत पालिका विभागीय कार्यालया समोर केलेल्या आंदोलनातील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल !
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी व रविवारी असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यास सांगीतले होते.

4. केंद्राकडून जास्तीत जास्त लसीचा पुरवठा होणे गरजचे - खासदार श्रीकांत शिंदे
 कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. 

5. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलची भाजपा कार्यकर्त्यासह खेळाडूनीच केली साफसफाई..
उल्हासनगर चार येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाल्याने काल अखेर भाजपाचे मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे यांच्यासह खेळाडूनीच त्या क्रीडा संकुलाची साफसफाई केली.  

6. दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात बडतर्फ गुन्हे दाखल करण्याची मागणी
-अमरावतीमधील मेळघाट येथे कार्यरत असलेल्या आरएफओ दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करा.

7. ट्रॅक्टर मोटार सायकलच्या अपघातात एक ठार एकजण गंभीर जखमी
जिंतूर परभणी रोडवरील मैनापुरी जवळ अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात मोटारसायकलला समोरून धडक दिली यात मोटारसायकल वरील महिलेच्या डोक्यावरून ट्रॅक्टर गेल्याने जागीच मृत्यू झाला.

8. महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि इतिहास आहे. 
पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीने क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी ही महाराष्ट्र पोलीस दलासमोरची आजची मोठी आव्हाने आहेत. अशाही परिस्थितीत या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेले धैर्य व शौर्य हे गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

9. दिलासादायक ! राज्यात कोरोना रुग्ण घटले
राज्यामध्ये सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून मात्र रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने दिलासा मिळाला आहे.

10. 'आयपीएल'मधून सॉफ्ट सिग्नल गायब होणार
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने सॉफ्ट सिग्नल हटवण्यासह शॉर्ट रन आणि नोबॉलबद्दलही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतून सॉफ्ट सिग्नल गायब होणार असून मैदानावरील पंच तिसऱ्या पंचांची मदत मागतील त्यावेळी त्यांना सॉफ्ट सिग्नल द्यावा लागणार नाही.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *