Breaking News

1/breakingnews/recent

30 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - परिस्थितीनुसारच निर्णय घेणार - राजेश टोपे...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. नवेगांव बांध येथे एका गाइने दोन तोड़ असलेल्या वासरला जन्म
 गोंदिया जिल्ह्यातील नवेगांव बांध येथील शेतकरी दिनेशचंद्र उसवने यांच्या घरी असलेल्या गायी ने दोन डोके असलेल्या वासरला जन्म दिल्याने बघणाऱ्याची गर्दी जमली होती  या वासराला दोन तोड़ चार  डोळे आहेत मात्र शारीरिक व्यंग आहे  ही बातमी परिसरात कळताच बघणाऱ्यांची  गर्दी जमली.

2. CSC दुकानदारांना दुकान उघडण्याची परवानगी द्या
सध्या परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कोरोना महामारीची साखळी तुटावी यासाठी संचारबंदी लागू केली आहे. पण csc सेंटर बंद असल्यामुळे नागरिकांनी आपले पॕन कार्ड आधारशी लिंक कसे करावे कारण लिंक करण्याची 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. 

3. अमरावतीत एकाला बेदम मारहाण
अमरावती शहरातील नवसारी जवळील यश बार जवळ काल सायंकाळी धुलीवंदनाच्या दिवशी सहा जणांनी एका 21 वर्षीय युवकाला काठीच्या साहाय्याने बेदम मारहाण केली,यात युवक मृत्यूशी झुंज देत असून सार्वजनिक ठिकाणी घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

4. चीनला जागतिक आरोग्य संघटनेची क्लिनचीट
गेल्या वर्षभरापासून अवघ्या जगभऱात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाची निर्मिती चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत नाही, तर वटवाघुळांपासून झाली. 

5. "पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

6. परिस्थितीनुसारच निर्णय घेणार - राजेश टोपे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील लॉकडऊनला विरोध केला आहे. तसेच विरोधकांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. 

7. दापोरा येथील तरूणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या
 बाहेर फिरून येतो असे सांगून घरातून निघलेल्या विशाल शांताराम पवार या तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना आज  शिरसोली शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

8. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेला भीषण आग
सदाशिव पेठ येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेला भीषण आग लागली आहे. भंगाराच्या साहित्याला आग लागली असल्याचे समोर येत आहे. याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

9. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. पोपट विष्णू दराडे असं आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. पोपट दराडे यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट

10. 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप'च्या फायनलवर कोरोनाचं सावट
भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला. ही मालिका भारताने जिंकली आणि त्याचबरोबर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये जागा मिळवली आहे. पण आता या फायनलवर कोरोनाचं सावट पसरलं आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *