30 मार्च सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - डॉ. शीतल आमटे आत्महत्येचा गुंता सुटेना...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. मंत्री रमेश बागवे व आमदार धीरज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल का नाही ?
केंद्र सरकारच्या विरोधात लातूर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने दि. २७ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यामध्ये दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्यामुळेच लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
2. पाथरीमध्ये पावणे पाच लाखाचा गुटका जप्त.
तिकडे परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथरी येथील सेलू कॉर्नर परिसरातील एका गोडाऊनमधून 4 लाख 80 हज़ार 240 रुपयांचा गुटका 29 मार्च रोजी पहाटे जप्त करीत एकास ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार यांना पाथरीतील सेलू कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात गुटका साठऊन ठेवला असल्याची माहिती मिळाली.
३. गडचिरोली पोलीसांनी केला 5 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली पोलीसांच्या सि-60 जवानांनी कुरखेडा क्षेत्रातील खोब्रामेंढा जंगलात आज सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास पाच जहाल नक्षलवाद्यांना ठार करुन मोठयाप्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात यश आले आहे. या मध्ये 2 महीला नक्षवाद्यांचया समावेश आहे.
4. डॉ. शीतल आमटे आत्महत्येचा गुंता सुटेना
महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. पण चार महिने उलटूनही यात प्रगती होत नसल्याचे चित्र दिसत आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर तज्ज्ञांना अपयश आलं आहे.
5. बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद देण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासहित इतर नेत्यांनीही ही नाराजी जाहीरपणे उघड केली आहे.
6. लॉकडाउनसंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान
राज्यात एकीकडे करोना रुग्णसंख्या वाढत असताना ठाकरे सरकारकडून लॉकडाउन लावलं जातंय की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याची निर्देशही दिले होते.
7. किरीट सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे.
अनिल परब यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा बळकावली आणि या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असे सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
8. शरद पवारांची प्रकृत्ती स्थिर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
9. एका जुन्या वादातून युवकाला बेदम मारहाण
अमरावती शहरातील नवसारी जवळील यश बार जवळ काल सायंकाळी धुलीवंदनाच्या दिवशी सहा जणांनी एका 21 वर्षीय युवकाला काठीच्या साहाय्याने बेदम मारहाण केली,यात युवक मृत्यूशी झुंज देत असून सार्वजनिक ठिकाणी घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
10. प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू
पंजाबी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी अमृतसर येथून करतारपूरला जात असताना हा अपघात झाला आहे. जंडियाला गुरुजवळ ही दुर्घटना घडली. दिलजानचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिलजानच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments
Post a Comment