30 मार्च सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस.....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. बलात्कार करणाऱ्यासोबतच दोरीने बांधून काढली पीडितेची धिंड
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून जवळपास ४०० किमी दूर अंतरावर असलेल्या आदिवासी बहुल अलिराजपूर जिल्ह्यातील एका गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
2. कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय
करोनाचा विषाणू जसा आपले रुप बदलतो आहे, त्याचा आता सेकंड म्युटंट आला आहे तसेच काहीसे आता रुप बदलणारी गुन्हेगारी आली आहे.
3. राज्यातील सोळा हजार विद्यार्थ्यांना दूरची शाळा
राज्यातील ३ हजारांहून अधिक वस्त्या, गावे याठिकाणी तीन किलोमीटर परीघाच्या आत शाळा उपलब्ध नसल्यामुळे १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेत जावे लागणार आहे.
4. राज्यात दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित
राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करत, राज्यात रात्रीची संचारबंदी देखील घोषित केलेली आहे.
5. Aadhar Card लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस,
Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले असून 31 मार्चपर्यंत Pan Card ला Aadhar Card लिंक केलं नाही तर तुमचे Pan Card बंद पडणार आहे.
6. बलात्कार पीडितेच्या ‘त्या’ व्हिडिओवरुन उर्मिला मातोंडकर संतापल्या
मध्य प्रदेशमध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबतच दोरीने बांधून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
7. दिल्लीत भाजपा नेत्याने पार्कमध्येच गळफास घेत केली आत्महत्या
दिल्लीत भाजपा नेत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्याने घराजवळील पार्कमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
8. तृणमूलच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू: भाजपचा आरोप
पश्चिाम बंगालमधील २४ परगणा जिल्ह््यात भाजप कार्यकत्र्याच्या ८२ वर्षीय मातेला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे या महिलेचा अलिकडे मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप कार्यकत्र्यांनी या प्रकरणी निमला पोलीस ठाण्यात निदर्शने केली.
9. सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली
अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे यांची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सचिन वाझे यांच्या छातीत अचानक दुखायला लागले.
10. औरंगाबादेत कॉन्स्टेबलने तक्रारदारालाच धुतलं
पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या जखमी तरुणाला पोलिसांनीच बेदम मारहाण केल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. डोकं फुटलेल्या अवस्थेत तरुण पोलिस स्थानकात गेला असताना पोलीस कॉन्स्टेबलनेच त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
No comments
Post a Comment