Breaking News

1/breakingnews/recent

30 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - ३० एप्रिलपर्यंत दहावी बारावी वगळता शाळा बंद राहणार...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. ३० एप्रिलपर्यंत  दहावी बारावी वगळता  शाळा बंद राहणार
जिल्ह्यातीलकोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिनांक 30 एप्रिलपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता सर्व सरकारी व खासगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत या आदेशामुळे आता पुढील महिनाभर अहमदनगर जिल्ह्यातील शाळांमधील चिमुकल्यांचा किलबिलाट थ्याम्बणार आहे  

 2. जामखेडमध्ये कोरोणाचा उद्रेक
जामखेड तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव  दररोज वाढत असून रुग्ण संख्या मध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे यामुळे आता चिंता वाढत चाललीये रुग्णाणी  सलग दोन दिवस अर्धशतक झळकावले आहे सोमवारी जामखेड तालुक्याला आजवरचा सर्वात मोठा दणका दिला आहे ठरवले आहे.

3. जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स रात्री आठ वाजेनंतर बंद राहणार
जिल्ह्यातील सर्व हॉटेल रेस्टॉरंट रात्री आठ वाजे नंतर पूर्णत  बंदरातील दहावी आणि बारावी वगळता सर्व शाळा बंद राहणार अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली.

4. अकोले तालुक्यात बापलेकींचा शेततळ्यात बुडून मृत्यू
तालुक्यातील वीरगाव येथील एका बापलेकीचा धुलिवंदनाच्या दिवशी शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अत्यंत हृदय हेलावून टाकणारी ही घटना वीरगाव  परिसरातील गणोरे रोडलगत घडली.

5. इंदुरीकर महाराज वाचणार का
पुत्रप्राप्ती संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराज यांच्या प्रकरणाच्या सुनावणी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे वादग्रस्त विधाननांतर  इंदुरीकर महाराजांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात  गुन्हा दाखल झाला.

6. खाजदार  डॉ.  सुजय विखे यांचा विरोधकांवर आरोप
सहकारी तत्वांवर चालवला जाणारा राहुरी कारखाना बंद पाडून त्याचे खाजगीकरण करण्याचा विरोधकांचा डाव असून त्यासाठी येत्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधक निवडणूक लढवणार आहेत.

7. संगमनेर तालुक्याची वाटचाल लॉक डाउन कडे
अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने जिल्ह्यातील अहमदनगर शहर राहता संगमनेर कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील कोविड  स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

8. नेवासा तालुक्यातील या गावात जनता कर्फ्यू घोषित
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील कोरणा रुग्ण संख्या वाढत असल्याने जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह नेवासा तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

9. शेतातील झोपडी पेटवली
नेवासा तालुक्यात एका शेतातील झोपडीला कोणी अज्ञाताने आग लावल्याची  घटना घडली आहे दरम्यान या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतात असलेली झोपडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे.

10. कोरोनामुळे  शिर्डिकडे भाविकांनी फिरवली पाठ
सलग सुट्ट्यां असून देखील कोरोनामुळे शिरडीमध्ये भाविकांनी पाठ फिरवलीये एरवी सुट्ट्यांच्या  काळात   साईभक्तांनी गजबजून जाणारी साईंची शिर्डी आज मात्र ओस पडलीये  कोरोनच्या  वाढत्या प्रादुर्भावामुळे शिर्डीत  साई भक्तांची संख्या खूपच कमी झाली आहे त्यामुळे अर्थकारण सुद्धा मंदावल आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *