Breaking News

1/breakingnews/recent

30 मार्च Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - नांदेड येथे शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर हल्ला........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट



TOP HEADLINES

1. ८५ टक्के रुग्ण आठ राज्यांत
महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाबसह देशातील आठ राज्यांमध्ये करोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत वाढ झाली आहे. एका दिवसात नोंदवण्यात आलेल्या करोनाच्या ६८,०२० नव्या रुग्णांपैकी या राज्यातील रुग्णांचे प्रमाण ८४.५ टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले. 


2. टाळेबंदीऐवजी कठोर निर्बंध!
राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगरीय रेल्वे वाहतूक सध्या तरी सुरू राहील. परंतु, रेस्टॉरंट्स, मॉल्स, सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये आणि पब्ज यांच्यावर तेथील अतिगर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लादले जातील. 


3. जम्मू-काश्मीर मध्ये नगरपालिका कार्यालयावर दहशतवादी हल्ला
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार येथे आज(सोमवार) दुपारी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सोपोर येथील नगरपालिका कार्यालयावर हल्ला करत गोळीबार कोला. 


4. गडचिरोली येथील महालक्ष्मी ट्रेडर्स ला आग
 गडचिरोली - धानोरा रोड फारेस्ट नाक्या जवळील इंदिरा नगर येथील एका महालक्ष्मी ट्रेडर्स हार्डवेअर च्या दुकानाला येण धुलिवंदनेच्या दिवसी अचानक विधुत शार्ट शर्किट ने आग लागल्याने जवळपास चार ते पाच लाख रूपयांचे नुकसान होऊन संपुर्ण हार्ड वेअर चे सामान जडून खाक झाले आहे 


5. सहाय्यक पोलीस आयुक्तांनी केला वाहतुक पोलीसाचा सन्मान
.उल्हासनगर शहर वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता एका महीलेचे प्राण वाचविल्याने शहर वाहतूक उपशाखा उल्हासनगर चे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड यांनी त्या हवालदाराचा पुष्पगुच्छ देवुन सन्मान केला.

6. शेततळ्यात बुडून दोन तरुण मित्रांचा मृत्यू
जालन्यातील पिर पिंपळगाव शिवारातशेततळ्यात बुडून दोन तरुण मित्रांचा मृत्यू झालाय...32 वर्षीय गजानन रामलाल जोरले व 30 वर्षीय कैलास आसाराम खरात  असे मयत मित्रांची नावे आहेत... दोघे  पोहण्यासाठी रवी प्रल्हाद कावळे यांच्या शेतात पीर पिंपळगाव शिवार शेततळ्यात गेले होते.


7. जमावबंदीचा आदेश धुडकावणाऱ्यांवर कारवाई
राज्यामध्ये  रात्री आठ वाजल्यापासून जमावबंदीचा आदेश लागू झालेले असताना होळी निमित्त बोईसर जवळील नांदगाव येथील सांज रिसॉर्ट येथे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी रविवारी रात्री छापा टाकून ४७ लोकांवर कारवाई केली.

8. नांदेड येथे शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर हल्ला
 नांदेड येथे शीख समाजाच्या हल्ला मोहल्ला कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात दंगा झाला आहे. सदर दंगलीत चार पोलीस कर्मचारी गंभीर तर दहा जण अत्यवस्थ आहेत. 

9. कोरोना संकटामुळं जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शन वेळांमध्ये बदल
कोरोना विषाणूचा संसर्ग फोफावू लागल्यानंतर महाराष्ट्रात मंदिरंही बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलं होतं. पण, काही काळानंतर नियमांमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात झाली आणि नागरिकांना मोकळीक मिळाली. अनेक ठिकाणी नागरिकांची ये-जा सुरु झाली.

10. उजनी धरणात घातक सकर मासा मिळू लागल्याने मच्छिमार अडचणीत
उजनी जलाशयात  मांगुर मासे सापडल्यानंतर आता आणखी एका उपद्रवी, घातक असलेले सकर मासे सापडू लागल्याने मासेमारांची चिंता वाढली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *