Breaking News

1/breakingnews/recent

29 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - सोने-चांदी पाठोपाठ आता जनावरांची होऊ लागली चोरी...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES


1. कोरोनाचा नगरचा अहवाल येईपर्यंत व्यक्तीस विलगीकरण कक्षात ठेवावे
सध्या कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्याला रोखण्याकरिता शासन अनेक प्रयत्न करीत असून तेही फोल ठरत आहे. या परिस्थिती मध्ये नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याबरोबर इतरांची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.

2. पोलीस बंदोबस्तात पेटली मढी येथील होळी
कान्होबा देवस्थान समिती, पोलीस, महसूल प्रशासन अशा तिहेरी समन्वयाने श्री क्षेत्र मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी रविवारी ५ वाजता बंदोबस्तात पेटली.

३. सोने-चांदी पाठोपाठ आता जनावरांची होऊ लागली चोरी
जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहेत यात काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये पैसे सोने-चांदीचा ऐवज लुटल्याचा घटना घडल्या होत्या मात्र आता चक्क शेतकऱ्यांच्या गोठ्यात बांधण्यास सुमारे एक लाख रुपये किमतीच्या दोन जर्सी गाई अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या तर याबाबत अशी माहिती आहे.

4. काँग्रेस सोडणार्‍यांवर पायरीवर उभी राहायची वेळः थोरात
काहींना वाटले भाजपत गेले की मंत्रिपदे मिळतात. डावपेच करायला जातात आणि तेच फसतात.
डावपेच करायला जातात आणि तेच फसतात. काँग्रेस सोडणार्‍यांवर आता पायरीवर उभे राहायची वेळ आली आहे.

5. राहुरी तहसीलमध्ये नागरिकांची आडवणूक खपवून घेणार नाही : मंत्री प्राजक्त तनपुरे
राहुरी तहसील कार्यालयात कामासाठी नागरिकांना दलालांची मदत घ्यावी लागते, हे दुदैवी असून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट कुठल्याही प्रकारे खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीच्या महसुल प्रशासनाला सुनावले.
 
6. राहाता शहर सात दिवसासाठी लॉकडाऊन
राहाता : शहर व परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख वाढता आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिक काटेकोरपणे करीत नाहीत. यामुळे राहाता शहर ३० मार्चपासून सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राहाता नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.

7. नगरच्या सायकलिस्ट शरद काळेंनी इमामरपूर घाटात पूर्ण केले एव्हरेस्टिंग
नगरचे सायकलिस्ट आणि गेल्या तीन वर्षांपासून सायकलिंगचा सुपर रेंडोरनअर पुरस्कार पटकवणारे शरद काळे यांनी आणि त्यांच्या चार साथीदारांनी सायकलिंगच्या माध्यमातून एव्हरेस्टिंग यशस्वीपणे पूर्ण केले आहे. जवळपास छत्तीस तासात त्यांनी एव्हरेस्टिंग पूर्ण केले. 
  
8. गुरुदत्त हौसिंग सोसायटी महसूल कॉलनीत लहान मुलांची आनंदात धुळवड साजरी
शेवगाव शहरातील गुरुदत्त हौसिंग सोसायटी महसूल कॉलनी येथे  मुलांनी आनंदात धुळवड साजरी केली. मागील वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलांनी सर्व सर्व घरातच साजरे केले. 

9. विखेंची महसूल मंत्र्यांवर जोरदार टीका  
वाळू तस्करी च्या मुद्द्यांवरून विखेंनी  महसूल मंत्र्यांवर जोरदार टीका केलीये वाळू वाहणाऱ्या तस्करांना पोसण्याचं काम सध्या सुरू आहे असा थेट आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.

10. विस्कळीत पाणी पुरवठ्यातून होणार श्रीरामपूरकर शहरवासियांची सुटका
श्रीरामपूर नगरपालिकेची पाणी पुरवठा विभागाची पाणी वितरण करणाऱ्या वितरिका जुन्या झाल्याने वारंवार लिक होणे किंवा फुटणे त्यामुळे दुरुस्तीसाठी पाणी पुरवठाही बंद ठेवावा लागतो किंवा विस्कळीत होतो. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *