Breaking News

1/breakingnews/recent

29 मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. बाह्य वळण महामार्गाच्या बांधकामाला अद्याप सुरुवात नाही
तिरोडा नगर परिषदेकडून  रस्ते बांधकामासाठी अनेक शेतकर्‍यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले होते. भूसंपादन होवून अनेक वर्षे लोटले  शेत मालकांना शासनाकडून मोबदला सुद्धा मिळाला आहे.

2. दीपाली चव्हाण आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या अटक करण्याची मागणी  
दीपाली चव्हाण या "लेडी सिंघम" च्या दुर्दैवी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या अपर मुख्य वन संरक्षक एम एस रेड्डी यांना देखील सहआरोपी करून त्यांना अटक करण्यात यावी. 

3. शिवशाही बस व पिकअप ची समोरासमोर धडक  
 तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असलेले शेतमजूर, मजूर वर्ग तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. मिरची तोडणीचे काम आटोपून ते पिकअप वाहन भाड्याने घेऊन स्व गावी होळीच्या सणानिमित्त त्याने परत येत  असताना. 

4. शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून बुधवारी एक शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेयांनी दिली.

5. केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे
 गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना  विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत जात असून, देशभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. रविवारी राज्यात ४० हजार ४१४ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे आता मुंबईवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे.

6. गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 31 मार्चला मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

7. एप्रिलमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे वाचा संपूर्ण लिस्ट
नवीन आर्थिक वर्ष 2021-22 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. एप्रिल 2021 मध्ये भारतातील खासगी आणि सार्वजनिक बँका एकूण 15 दिवस बंद राहतील. विविध बँकांच्या सुट्टीमुळे 9 दिवस बंद राहतील. सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणून, आम्ही एप्रिल 2021 मध्ये शनिवार आणि रविवारी जोडल्यास एकूण 15 दिवस बँका बंद असतील.

8. बेशिस्त नागरिकांमुळेच गावात आला कोरोना
शिरपूर  कोरोना कडे कानडोळा करीत नियमांना ठेंगा दाखवित बेशिस्त नागरिकांनी लग्नकार्य , अंत्यविधी , बाजार , हाँटेल्स व चौकात या सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करून कोरोना ला निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. 

9. बिबट्याने केला शेतकऱ्यावर हल्ला
जिंतूर तालुक्यातील खरदडी या गावात २८ मार्च दुपारी ३ च्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्यावर अचानक हल्ला  केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याने शेतकऱ्याच्या नातेवाइकांनी जखमी शेतकऱ्यास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.  

10. राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर चंद्रकात दादांचं सूचक वक्तव्य
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गृप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावरुन राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. यासंदर्भात आज पुण्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *