29 मार्च सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - रंगपंचमीला जावयाची गाढवावरून वरात..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. सुएझ कालव्याने घेतला मोकळा श्वास
इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकून पडलेलं मालवाहू जहाज बाहेर पाढण्यात पाच दिवसांनंतर यश आलं आहे. रॉयटर्सच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2. चार कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लागणार?
भारतात सध्या १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांची संख्या ४ कोटी आहे. ही वाहने प्रदूषणवाढीस कारणीभूत आहेत. त्या वाहनांवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय ‘ग्रीन टॅक्स’ लावण्याचा विचार करत आहे. १५ वर्षांहून अधिक जुनी वाहने कर्नाटक मध्ये सर्वात जास्त आहेत.
3. मुख्यमंत्र्यांनी मोदी-शहांच्या पाय पडताना पाहणे असह्य
तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांना खाली वाकून पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करायला सांगितले गेले. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांना नतमस्तक होण्यास भाग पाडलेले पाहणे असह्य आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.
4. विदेशातून येणारी उड्डाणे थांबवा
शभरात अलीकडे करोना संसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने ब्रिटन आणि दक्षिण अफ्रि के तून येणारी उड्डाणे थांबवावी, अशी सुमारे दोनतृतीयांश लोकांची इच्छा आहे, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
5. पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकू : शहा
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त के ला आहे.
6. पोटात दुखू लागल्याने शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
7. तब्बल 1024 कॉलेजांची यंदा शुल्कवाढ नाही
येत्या शैक्षणिक वर्षात कोणत्याही पद्धतीची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय महाविद्यालयांनी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 1 हजार 024 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी फी वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे
8. आरोपींच्या प्रतिमांचं नवनीत राणांच्या हस्ते होलिकादहन
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी होळीचे दहन केले. वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींच्या प्रतिमेचे दहन राणा दाम्पत्याने केले.
9. रंगपंचमीला जावयाची गाढवावरून वरात
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात दशकांपासून रंगपंचमी म्हणजे धुळवड साजरी करण्याची एक अनोखी परंपरा आहे. या परंपरेनुसार 'निवडलेल्या जावयाला' गाढवावर बसून सैर केली जाते.
10. भाजप नगसेविकेच्या मुलाने संपवलं जीवन
पिंपरी चिंचवड शहरातील भाजप नगरसेविकेच्या मुलाने स्वतःवर गोळी झा़डून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रसन्न शेखर चिंचव़डे असे आत्महत्या केलेल्या 21 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
No comments
Post a Comment