Breaking News

1/breakingnews/recent

28 मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री शेतकरी आंदोलकांचा संताप, भाजप आमदाराला मारहाण...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. जालन्यात 440 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली
जालना शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेत एकूण कोरोना बाधित रुग्णाचा आकडा 24601  झालाय काल दिवसभरात प्रयोग शाळा व अँटीजन चाचणी अहवाल प्राप्त झालेत.
2. सेलू नगरपालिकेच्या वतीने सॕनिटायझरने फवारणी 
परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वच तालूक्यात  संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांकडून संचारबंदीस विरोध राहिला. 
3. उदगीर शहरातील भाजी मार्केट मध्ये गर्दी 
लातूर जिल्ह्यातील उदगीर इथल्या भाजी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते याठिकाणी अनेक नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत तर इथं सोशल डिस्टन्सच्या फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे.

4. राज्यमंत्री बच्चू कडू तिसऱ्यांदा केली कोविड टेस्ट

आजपासून 15 एप्रिल 2021 पर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू असणार आहे. हा कर्फ्यू रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत असेल. या वेळेत उद्याने, चौपाट्या अशा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. 
5. 35ते 40 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल..
काल केंद्र सरकारच्या विरोधात लातूर मध्ये  काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. पोलिसांच्या वतीने कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला गेलाय .घोषणा दिल्या. 
6. म्यानमारमध्ये लष्कराडून  नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार
गेल्या माहिनाभरापूर्वी 1 फेब्रुवारीला म्यानमार या देशात लष्कराने राष्ट्राध्यक्ष आंग सान स्यू की यांचे सरकार उलथवून टाकत लष्करी राजवट लागू केली आहे. 

7. शेतकरी आंदोलकांचा संताप, भाजप आमदाराला मारहाण

पंजाबमधील अबोहार मतदारसंघाचे आमदार अरुण नारंग यांना काही आंदोलकांनी कथित मारहाण केल्याचे समोर आले आहे. हे आंदोलक शेतकरी असल्याचे समजते. मुक्तसार जिल्ह्यातील मालौट भागात ही घटना घडली आहे. 

8. होळी, धूलिवंदनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा

परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत, येणारी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. 

9. भिवंडीत  ग्रामीण कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले असल्याने कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी भिवंडीतील सवाद येथे 818 बेडच्या भव्य अशा अत्याधुनिक सुविधायुक्त जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

10. टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज-रोहित शर्मा    

क्रिकेटविश्वात दररोज कित्येक जुने विक्रम मोडत असतात आणि नवे विक्रम बनत असतात. काही दिवसांपुर्वी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाच सामन्यांची टी२० मालिका पार पडली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *