Breaking News

1/breakingnews/recent

28 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - तृणमूल उमेदवाराने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. शेकडो नागरिक जखमी
इंडोनेशियातील दक्षिण सुलावेसी प्रातांची राजधानी असलेल्या मकस्सर शहरात भयंकर बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. मकस्सरमधील एका कॅथेड्रल चर्चसमोर हा स्फोट झाला असून, स्फोटाची तीव्रता इतकी होती की, मृतदेहाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.

2. भारत-बांगलादेश शांततेसाठी आग्रही
भारत आणि बांगलादेश यांना जगात स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी आहे; अस्थिरता, दहशतवाद आणि अस्वस्थता नको आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. पंतप्रधान मोदी मतुआ समुदायाच्या सदस्यांपुढे बोलत होते.

3. पश्चिम बंगालमध्ये ७९.७९, तर आसाममध्ये ७७ टक्के मतदान
तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील टोकाच्या संघर्षामुळे देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७९.७९ टक्के मतदान झाले. 

4. मेहबूबा मुफ्ती यांच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री निधीची चौकशी
काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री निधीतून निकटवर्तीयांना पैसा देण्यात आल्याच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने तपास सुरू केला आहे.

5. साधेपणाने होळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. 

6. सचिन तेंडुलकर पाठोपाठ युसूफ पठाणही करोना पॉझिटिव्ह
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळणाऱ्या भारतीय संघातील दोन माजी खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता युसूफ पठाणलाही करोनाचा संसर्ग झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं. युसूफने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. 

7. तृणमूल उमेदवाराने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पुरुलिया येथील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सुजय बंदोपाध्याय यांनी बाचाबाचीदरम्यान भाजपचे नेते दीपक बाउरी यांना कथितरीत्या गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. 

8. म्यानमारमध्ये ९१ निदर्शक ठार
म्यानमारमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी बंडानंतर शनिवारी सुरक्षा दलांनी एका दिवसात ९० हून अधिक जणांना ठार केल्याचे वृत्त आहे. लष्कराच्या बंडानंतर म्यानमारमध्ये निदर्शने करण्यात येत असून शनिवार हा सर्वात रक्तरंजित दिवस ठरला.

9. नंदीग्राममधील संघर्षात तिघे जखमी
येत्या १ एप्रिलला निवडणूक होणार असलेल्या पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम मतदारसंघात शनिवारी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकत्र्यांमध्ये संघर्ष होऊन किमान तीन जण गंभीर जखमी झाल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

10. होसाना हालेलूयांच्या जयघोषात येशू ख्रिस्ताचा जयजयकार    
आज जगभरात ख्रिस्ती बांधव झावळ्यांचा रविवार म्हणजेच पाम संडे साजरा करीत आहेत ,येशू ख्रिस्त हा  राजांचा राजा आहे अशा घोषणा या दिवशी ख्रिस्ती बांधव होसाना होसाना हालेलूया म्हणजेच देवाची स्तुती असो अशा प्रकारे देत असतात


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *